‘भयानक इस्लामिक टेररिस्ट अटॅक..’,तुलसी गॅबार्ड यांचं खळबळ जनक वक्तव्य, तर आम्ही भारताला…

भारत सरकारने पहलगामवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांनाही वेचून ठार केले जाईल अशी घोषणा केली आहे. या क्षेत्रात गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

भयानक इस्लामिक टेररिस्ट अटॅक..,तुलसी गॅबार्ड यांचं खळबळ जनक वक्तव्य, तर आम्ही भारताला...
PM Modi and US Intelligence Director Tulsi Gabbard
| Updated on: Apr 26, 2025 | 12:12 AM

जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल २०२५ ) झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर देशात दुखवटा सुरु आहे. या अत्यंत भयानक हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठींबा मिळत आहे. एरव्ही पाकिस्तानाला मदत करणाऱ्या अमेरिकेने युटर्न घेतला आहे. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिका भारताची मदत करणार असल्याचे अमेरिकेने प्रथमच म्हटले आहे आणि याची घोषणा दस्तुरखुद्द अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख (DNI) तुलसी गॅबार्ड यांनीच केली आहे. त्यांनी या क्रुर हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. आणि भारतीय लोकांच्या प्रती सहवेदना व्यक्त केली आहे.

तुलसी गॅबार्ड यांचं वक्तव्य –

“या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी मनापासून सहवेदना व्यक्त करीत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि या भयानक हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शासन करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे,” तुलसी गॅबार्ड यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मोदी यांनी सौदी दौरा अर्धवट सोडत राजधानी गाठली…

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे.हा गेल्या दोन दशकातील सर्वात मोठा हल्ला आहे. त्यात २६ पर्यटकांना लक्ष्य केले आहे. भारत सरकारने हे स्पष्ट केले आहे की कोणत्याही किंमतीवर दोषींना सोडले जाणार नाही असे भारताने ठणकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सौदी दौरा अर्धवट सोडत राजधानी दिल्ली गाठली आणि विमानतळावर बैठक घेतली. त्यानंतर रात्री उशीरा पाकिस्तानवर अक्षरश: लिगल स्ट्राईक करण्यात आला. सिंधु नदीचे पाणी अडवण्याबरोबरच,व्हीसा बंदी,अटारी बॉर्डर बंद असे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकण्यात आले आहेत.