मोठी बातमी! आणखी 6 देश इराणविरोधात मैदानात, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना निरोप, जगभरात मोठी खळबळ

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, इराणचा एकीकडे अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात तर लढा सुरूच आहे. मात्र आता इराणला आणखी सहा देशांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मोठी बातमी! आणखी 6 देश इराणविरोधात मैदानात, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना निरोप, जगभरात मोठी खळबळ
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 3:12 PM

इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या 19 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी मारले गेले आहेत. ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा देखील समावेश आहे. मात्र तरी देखील इराणने अद्याप माघार घेतलेली नाहीये, इराणचा अमेरिका आणि इस्त्रायलसोबत लढा सुरूच आहे. इराणने देखील प्रत्युत्तरा दाखल अमेरिका आणि इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला केले आहेत. इराणने केवळ अमेरिका आणि इस्त्रायललाच टार्गेट केलं नाही तर ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं होती, त्या सर्व देशांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान दुबईचं झालं आहे.

त्यातच इराणने या युद्धादरम्यान मोठी खेळी केली आहे. ती म्हणजे स्ट्रेट ऑफ होमूर्ज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्ट्रेट ऑफ होमूर्ज वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे जगभरात सध्या भीषण इंधन टंचाई जाणवत आहे. गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्याच कारण म्हणजे जगाला जेवढ्या गॅस आणि कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची वाहतूक या मार्गाने होते. हा मार्ग ओपन करण्यासाठी युद्ध नौका या ठिकाणी तैनात कराव्यात असं आवाहानही या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ड्रम्प यांनी काही प्रमुख देशांना केलं होतं. मात्र ट्रम्प यांच्या या आवाहनाला कोणाकडूनच फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकाचवेळी अमेरिका आणि इस्त्रायलसारख्या बलाढ्य देशांसोबत लढा देणारा इराण मोठ्या संकटात सापडला आहे. अमेरिका आणि इस्त्रालयसोबतच आता तब्बल 6 देश इराणविरोधात मैदानात उतरले आहेत. आखाती देशांनी इराणविरोधात मोर्चा उघडला असून, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार हे युद्ध मध्येच थांबवू नका, इराणचा पूर्ण बिमोड करा अशी मागणी गफ्ल कोऑपरेशन काउन्सिल (GCC) च्या सदस्य देशांकडून करण्यात आली आहे. जोपर्यंत इराणची पूर्ण क्षमता संपत नाही, तोपर्यंत थांबवू नका असा निरोप आखाती देशांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता इराणचं संकट वाढण्याची शक्यता आहे. गफ्ल कोऑपरेशन काउन्सिलच्या दसस्यांमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबीया, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात या सहा देशांचा समावेश होतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us