US, Israel, Iran War : ट्रम्प यांची युद्धातून माघार? अमेरिका सिझफायरसाठी तयार, आता इस्त्रायलचं काय होणार?

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे अमेरिकेकडून युद्धाबाबत मोठं मोठे दावे करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमुळे खळबळ उडाली आहे.

US, Israel, Iran War : ट्रम्प यांची युद्धातून माघार? अमेरिका सिझफायरसाठी तयार, आता इस्त्रायलचं काय होणार?
motozba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 5:42 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इराणने आपल्या मिसाईल हल्ल्यांनी इस्त्रायलमध्ये हाहाकार उडवला आहे. तर दुसरीकडे इराणकडून आखाती देशांमधील अमेरिकेची सैन्य तळं उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे. एकीकडे जागतिक मंचावर अमेरिकेकडून या युद्धासंदर्भात मोठ-मोठे दावे करण्यात येत आहेत. आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. इराणची सैन्य ताकद संपुष्टात आली आहे. इराणच्या नेत्यांकडून आमच्यासोबत युद्धविरामाचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा उघड उघडपणे केला आहे. इराण पराभवाच्या उंबरठ्यावर उभा असून, त्यांचे नेते कोणत्याही क्षणी सिजफायरसाठी आमच्यासोबत चर्चा करू शकतात, असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे.

मात्र आता एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ड्रॉप साइट न्यूजच्या एका रिपोर्टनुसार अमेरिका स्वत:सिझफायर करण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेचे विशेष दूत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय स्टीव विटकॉफ हे स्वत: युद्धविरामाबाबत इराणसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र जरी असं असलं तरी देखील आता इराण युद्धविरामासाठी तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. स्टीव विटकॉफ यांना इराणने यावर कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये.

अमेरिकेचे अधिकारी आणि सूत्रांच्या हवाल्यानं या रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, स्टीव विटकॉफ यांनी गेल्या आठवड्यात इराणचे उच्चपदस्त अधिकारी आणि परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांना संदेश पाठवला होता. दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे असं त्यांनी त्यामध्ये म्हटलं होतं. मात्र आमच्या सर्वोच्च नेत्याच्या आदेशामुळे आम्ही अमेरिकेच्या या संदेशाला उत्तर दिलं नसल्याचं इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सिझफायर होणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जरी समजा अमेरिका आणि इराणमध्ये सिझफायर झालंच तर इस्त्रायलचं काय होणार? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

 

Follow Us