मोठी बातमी! गेल्या 48 तासांमध्ये युद्धात मोठा उलटफेर, इस्त्रायल, अमेरिकेचा मोठा पराभव? नेतान्याहू हातबल, थेट म्हणाले आता…

मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या 48 तासांमध्ये इराण, इस्त्रायल, अमेरिका युद्धात मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. इराणने आपल्या मिसाईलच्या हल्ल्यानं इस्त्रायलमध्ये हाहाकार उडवला आहे. नेत्यानाहू चांगलेच हातबल झाल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! गेल्या 48 तासांमध्ये युद्धात मोठा उलटफेर, इस्त्रायल, अमेरिकेचा मोठा पराभव? नेतान्याहू हातबल, थेट म्हणाले आता...
Netanyahu
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 9:16 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 48 तासांमध्ये इराणने इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला असून, इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी अराद शहराला भेट दिली. या शहरावर इराणने मिसाईल हल्ला केला होता, या हल्ल्यामध्ये अराद शहराचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानाची पहाणी करण्यासाठी नेतान्याहू यांनी या शहराला भेट दिली. या शहाराची पहाणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जगातील सर्व प्रमुख नेत्यांना इराणविरोधात सुरू असलेल्या अमेरिका आणि इस्त्रायलच्या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक नेत्यांनी या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलची साथ द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान नेतान्याहू यांनी आता या युद्धात जगाची मदत मागितल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायल बॅकफूटवर गेलं आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

अराद येथे पत्रकारांशी बोलताना नेतान्याहू म्हणाले की, गेल्या 48 तासांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, इराण केवळ इस्त्रायलसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक मोठा धोका आहे. यरुशलममध्ये इराणने पवित्र धर्मस्थळांना टार्गेट केलं आहे. जर तुम्हाला पुरावाच पाहिजे असेल तर मागचे 48 तास बघा, यावरून हे सिद्ध होत आहे की, इराण हा सर्व जगासाठीच एक मोठा धोका बनला आहे. इराणकडून नागरी भागांना देखील टार्गेट केलं जात आहे. त्यांच्याकडून मोठ मोठया मिसाईलचा वापर करण्यात येत आहे. सुदैवानं या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यापुढे तशी कोणतीही खात्री देता येत नाही. नागरिकांची हत्या करणं हाच त्यांचा उद्देश असल्याचं देखील यावेळी नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.

त्यांच्याकडे लांब पल्ल्यांच्या मिसाईल्स आहेत. ज्याचा वापर करून ते समुद्री आणि ऊर्जा मार्ग बंद करत आहेत. जगाला ते ब्लॅकमिल करत आहेत असं यावेळी नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या सैन्य तळांवर देखील हल्ले सुरूच ठेवले आहेत. ज्या -ज्या आखाती देशांमध्ये इराणची सैन्य तळे आहेत, त्या -त्या देशांना इराणकडून टार्गेट करण्यात येत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us