
मोठी बातमी समोर येत आहे, प्रशांत महासागरामध्ये आता तणाव प्रचंड वाढला आहे, महाशक्ती देश मैदानात उतरले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि जपानमध्ये आधीच संघर्ष पेटलेला होता, त्यामध्ये चीनच्या बाजूने रशियानं कारवाई केली, त्यानंतर आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे. जपानच्या समर्थनार्थ अमेरिकेनं आता आपलं सर्वात खतरनाक बी-2 बॉम्बर फायटर जेट बाहेर काढलं आहे, सध्या अमेरिकेचं बी 2 बॉम्बर जपानच्या एफ-35 आणि एफ-15 सह एकूण 10 फायटर जेटसह पूर्व चीनी समुद्रात पेट्रोलिंग करताना दिसून येत आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, याच आठवड्यात चीनने रशियाच्या फायटर जेटसोबत मिळून या भागामध्ये पेट्रोलिंग केलं होत, त्याला उत्तर देण्यासाठी आता अमेरिकेनं आपलं बी-2 बॉम्बर फायटर जपानच्या मदीतला पाठवलं आहे.
चीन आणि रशियाच्या वायुदलानं मंगळवारी इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये संयुक्तपणे एअर पेट्रोलिंग केली होती. या पेट्रोलिंगदरम्यान रशियाच्या टीयू 95 स्ट्रॅजेजिक मिसाईल वाहक बॉम्बर जेटने चीनच्या एच-6 बॉम्बर्स सोबत ईस्ट चायना, जपानचा समुद्र आणि पश्चिम प्रशांत महासागरात टेहळनी केली. चीनचा जपानसोबत सुरू असलेल्या संघर्षच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली गेली, त्यानंतर आता जपानच्या मदतीला अमेरिका धावून आलं असून, जपान आणि अमेरिकेनं आता या भागात संयुक्त पेट्रोलिंग सुरू केलं आहे. दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना रशियानं म्हटलं होतं की, आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून ही पेट्रोलिंग केली आहे, मात्र दुसरीकडे जपान आणि दक्षिण कोरियाने रशियाच्या या भूमिकेला विरोध केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला तिसर्या महायुद्धाचा इशारा दिला आहे, युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून युद्ध सुरूच आहे, आता हे युद्ध थांबलं नाही तर जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जे देश युक्रेन आणि रशियाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करतात अशा सर्व देशांना हा माझा इशारा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी आता थेट बी 2 बॉम्बर जपानच्या बाजूनं मैदानात उतरवल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.