
अमेरिकेनं अनेक देशांवर टॅरिफ लावून नव्या व्यापार युद्धाला सुरुवात केली आहे, अमेरिकेनं चीनवर सर्वाधिक म्हणजे 100 टक्के टॅरिफ लावला आहे, तर त्यानंतर भारत आणि ब्राझील सारख्या देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत आणि चीनकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर रशिया हा युद्धासाठी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
मात्र टॅरिफ लावून जगाला वेठीस धरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरूच आहे, या शटडाऊनचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या शटडाऊचा परिणाम आता विमान वाहतुकीवर देखील झाला आहे. सीएनएसच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेमधून होणारी 1700 पेक्षा जास्त विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. या शटडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्यामुळे सर्व सरकारी काम आणि योजना ठप्प झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन अडकल्यामुळे मार्केटमधील परिस्थिती डाऊन झाली असून, मागणी घटल्यानं पुरवठा वाढला आहे. अमेरिकेमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका हा तेथील विमान वाहतुकीला बसला आहे. अमेरिकेमध्ये हाहाकार उडाला आहे.
फ्लाइटअवेअर वेबसाइटच्या आकडेवारीनुसार शनिवारी तब्बल 1500 पेक्षा जास्त विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच 6600 विमान उड्डानांना विलंब झाला आहे, रविवारी तर याही पेक्षा जास्त बिकट अवस्था झाली आहे. अनेक विमानांची उड्डाण रद्द करण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे, कर्मचारीच नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला असून, प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
एकीकडे अमेरिकेमध्ये एवढा सगळा गोंधळ सुरू असताना मात्र दुसरीकडे ट्रम्प यांचे दावे सुरूच आहेत. नुकताच भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये 8 लढाऊ विमान पाडले गेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे, यापूर्वी पाच लढाऊ विमान पाडल्याचा दावा त्यांनी केला होता.