भयंकर! शेजाऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली; अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला बायकोने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

uttar pradesh shocking : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये अनैतिक संबंधातून बायकोने नवऱ्याची हत्या केली. बॉयफ्रेंडच्या साथीने बायकोने नवऱ्याची जिवंत जाळून हत्या केली.

भयंकर! शेजाऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली; अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला बायकोने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
| Updated on: Jun 28, 2026 | 1:51 PM

देशभरात पुण्यातील लोहगडमधील केतन अग्रवाल हत्याकांड गाजत असताना उत्तर प्रदेशातूनही धक्कादायक घटना घडली आहे.  उत्तर प्रदेशच्या बागपतमधून ही हादरवणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या नवऱ्याची क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. 80 टक्के भाजलेल्या नवऱ्याचा 7 दिवसानंतर मृत्यू झाला. बायकोने नवऱ्याची क्रूर हत्या केल्याने संपूर्ण बागपत हादरलं आहे.

बागपतमधील बिनौली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिजवाडा गावात ही घटना घडली. या गावात राजीव हा पत्नी निशासोबत राहत होता. राजीवची पत्नी निशा ही शेजारी राहणाऱ्या विक्रांतच्या प्रेमात पडली. काही दिवसांनी राजीवला निशाच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. नवऱ्याने निशाच्या अनैतिक संबंधाचा जोरदार विरोध केला.

प्रेमाला विरोध करणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव पत्नी निशाने रचला. तिने बॉयफ्रेंड विक्रांतच्या साथीने राजीवच्या हत्येचा कट रचला. त्यादिवशी तिने राजीवला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर राजीव बेशुद्ध झाले. नवरा राजीव बेशुद्ध झाल्यानंतर तिने बॉयफ्रेंड विक्रांतला घरात बोलावून घेतलं. पुढे निशाने विक्रांतच्या मदतीने राजीवच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं.

अन् रुग्णालयात राजीवने अखेरचा श्वास घेतला  

आगीत होरपळल्यानंतर राजीवच्या आवाजाने नातेवाईक धावत धावत मदतीला आले. तोपर्यंत राजीव 80 टक्के भाजला होता. त्यानंतर राजीवला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या राजीवची प्रकृती अधिकच खालावली होती. रुग्णालयात त्याची ७ व्या दिवशी मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी निशा आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. सुरुवातीला दोघांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु राजीव यांच्या मृत्यूनंतर दोघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला.  नवऱ्याच्या हत्येने संपूर्ण बागपतमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Follow Us