AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोनी कपूर आधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत श्रीदेवी यांचं होतं नवरा – बायकोसारखं नातं… जाणून व्हाल थक्क

'मिथुन दा शूटिंगमध्ये असायच्या तेव्ही श्रीदेवी त्यांच्या खोलीत...', तब्बल 3 महिने नवरा - बायको सारखे राहिले... श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या नात्याचं मोठं सत्य अखेर समोर, कोणी केला दोघांच्या नात्याचा मोठा खुलासा, सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याचीच चर्चा...

बोनी कपूर आधी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत श्रीदेवी यांचं होतं नवरा - बायकोसारखं नातं... जाणून व्हाल थक्क
Mithun Chakraborty and Sridevi
| Updated on: Jun 27, 2026 | 8:57 PM
Share

अभिनेते मुथिन चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बद्दल कोणाला माहिती नाही असं कोणी नसेल. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देत त्यांनी स्वतःची भक्कम ओळख इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली. पण एक काळ असा होता, जेव्हा श्रीदेवी आणि मिथुन दा त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते. दोघे एकमेकांना डेट करत होते, हे सर्वांना माहिती आहे. पण श्रीदेवी आणि मिथुन दा तीन महिने नवरा – बायको प्रमाणे राहत होते… हे कोणाला माहिती नसेल.. असं असून देखील दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. याबद्दल देखील मोठं कारण समोर आलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखातीत वरिष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी श्रीदेवी आणि मिथुन दा यांच्या नात्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.

ज्योती यांनी श्रीदेवी आणि मिथुन दा यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं, यावर त्या म्हणाल्या, ‘तुम्ही मला दोघांच्या नात्याबद्दल विचारत आहात… श्रीदेवी आणि मिथुन दा, तर 3 महिने लग्न झालेल्या नवरा – बायको प्रमाणे राहत होते… मिथुन दा कायम श्रीदेवी यांना आऊटडोर शुटिंगसाठी घेऊन जायचे. पण श्रीदेवी कधी सेटवर आल्या नाहीत…’

‘त्या हॉटेलच्या खोलीतच थांबायच्या. पण सर्वांना माहिती होतं की, श्रीदेवी, मिथुन दा यांच्या सोबत आहेत. त्यावेळी वेळ मिळाला तेव्हा मस्करीत मिथुन दा यांना विचारलं, तुम्हाला आता तामिळ येत असेल ना? हे सुद्धा मी त्यांना तामिळ भाषेतच विचारलं. त्यानंतर त्यांनी तामिळमध्ये बोलू नकोस… असं मला सांगितलं…’ असं देखली ज्योती म्हणाल्या…

रिलेशनशिपमध्ये असताना देखील दोघांचं लग्न का नाही झालं? असा प्रश्न देखील ज्योती यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, ‘तेव्हा मिथुन दा यांच्यापेक्षा श्रीदेवी यांची लोकप्रियता खूप होती. श्रीदेवी यशाच्या शिखरावर होत्या आणि मिथुन दा ओळख भक्कम करण्याचा प्रयत्न करत होते. एवढंच नाही तर, तेव्हा अनेक महिलांसोबत मिथुन दा यांच्या नात्याची चर्चा होती… अशात त्यांच्यावर विश्वात ठेवणं फार कठीण होतं. जेव्हा मिथुन दा यांनी योगिता बाली यांच्यासोबत लग्न केलं, तेव्हा लग्न फार काळ टिकणार नाही असंच सर्वांना वाटलं…’

‘पण आजपर्यंत मिथुन दा त्यांच्या बायकोसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यांनी तीन मुलं देखील आहेत. एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे.’ असं देखील ज्योती म्हणाल्या. सांगायचं झालं तर, श्रीदेवी आणि मिथुन दा यांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. पण आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात