
मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनआधी फतवा काढला आहे. नव्या वर्षाचं सेलिब्रेशन अनैतिक आहे असं मैलानाने म्हटलं आहे. इस्लाममध्ये नाच-गाणं, फुकटचा खर्च हे सगळं अनैतिक आहे. मुस्लिमांनी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनपासून लांब राहिलं पाहिजे. नवीन वर्ष हे ख्रिश्चनांसाठी एक संस्मरणीय क्षण आहे. मुस्लिमांसाठी नाही. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनबद्दल आपंल मत मांडलं. ते म्हणाले की, “31 डिसेंबरच्या रात्री लोक धांगडधिंगा, नाच-गाणी, पार्टी आणि फुकटचा खर्च करतात. हे वागणं इस्लामिक शरीयतनुसार, चुकीचं आणि निषिद्ध मानलं जातं“
“इस्लाममध्ये नव्या वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होत नाही. मुहर्रमच्या महिन्यापासून होते. म्हणून 31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणं इस्लामिक नियमांच्या विरुद्ध आहे. त्यांनी याला बेकार आणि गैरआवश्यक काम म्हटलं. जे धर्माच्या नजरेत बिलकुलही योग्य नाही“ असं मौलाना शहाबुद्दीन रजवी न्यूज एजन्सी ANI शी बोलताना म्हणाले.
नक्कल करुन नव्या वर्षाचं सेलिब्रेशन नको
मौलाना रजवी असं सुद्धा म्हणाले की, “फक्त मुस्लिमांमध्येच नाही, तर हिंदू धर्मातही नवीन वर्ष जानेवारीपासून नाही तर चैत्र महिन्यापासून सुरु होतं. अशावेळी पाश्चिमात्य परंपरांची नक्कल करुन नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणं हे कुठल्याही धर्माच्या मूळ मान्यतेमध्ये बसत नाही“
“कुठल्याही परिस्थितीत पार्टी आयोजित करु नका. कुठलाही युवक-युवती पार्टी करताना, नाचगाणी करताना दिसले तर इस्लामिक विद्वान अशा आयोजनांना कठोरतेने विरोध करतील“ असं इस्लामिक विद्वान म्हणाले.
लोकांना काय अपील केलं?
धर्माच्या शिक्षणाचं पालन करा असं त्यांनी लोकांना अपील केलं. नव्या वर्षाच्या नावाखाली अश्लीलता, फुकटचा खर्च आणि चुकीच्या कामांपासून लांब राहा. त्यांचं असं म्हणणं आहे की, माणसाने त्याचा वेळ चांगली काम, इबादत आणि समाज हितासाठी खर्च केला पाहिजे. धांगडधिंगा आणि कोणाला दाखवण्यासाठी वेळ खर्च करु नका.