विनोद तावडे यांनी अखेर मोठा डाव टाकला; आगामी निवडणुकीआधी घेतला गेमचेंजर निर्णय, आखला जबरदस्त प्लान
विनोद तावडे यांनी उत्तर प्रदेशात अखेर मोठा डाव टाकला आहे. त्यांनी आगामी निवडणुकीआधी गेमचेंजर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 2027 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची संघटना सक्रिय झाली आहे. आगामी निवडणुकीची महत्वाची जबाबादारी खांद्यावर असलेल्या विनोद तावडे यांनी दोन दिवसांचा लखनौचा दौरा आखला आहे. उत्तर प्रदेशचा प्रभारी झाल्यानंतर त्यांचा पहिला दौरा आहे. आगामी निवडणकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी जिल्हा स्तरावरील नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. त्यांच्या बूथ पातळीवरील तयारी आणि आगामी कार्यक्रमाविषयीचा आढावा घेणार आहे. बूथ ते संघटन पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ बसवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
तावडेंचा कार्यकर्त्यांना संदेश काय?
विनोद तावडे यांनी पूर्ण भाजपचं संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. तावडे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची स्थिती, सक्रिय कार्यकर्त्यांना दिशा देण्याचा निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वागत पोस्टर, बॅनरबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भाजपचे महासचिव तावडे यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान बॅनरबाजी करू नये. कोणत्याही प्रकारची गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याने सर्वसामान्यांना त्रास होतो. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे शक्तीप्रदर्शनापासून दूर राहावे’.
विनोद तावडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. तावडे यांनी स्पष्टपणे आगामी निवडणुकीची तयारी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. आगामी निवडणुकीसाठी संघटना मजबूत केली पाहिजे, स्वागतावर खर्च करण्यापेक्षा ग्राउंड लेव्हलला काम करणयाला प्राधान्य दिलं पाहिजे, असे त्यांनी म्हटलं.
भाजपचे मुत्सद्दी राजकारणी
विनोद तावडे यांच्याकडे भाजपचा मुत्सद्दी राजकारणी म्हणून पाहिलं जात आहे. त्यांच्याकडे बिहारची राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली होती. बिहारमध्ये यश मिळाल्यानंतर आता उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना उत्तर प्रदेशातील जातीच्या बेरजेचं समजून घ्यावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर गैर यादव आणि कोअर व्होट बँकेत संतुलन ठेवण्याचं काम त्यांच्यावर असणार आहे.