कॉलर पकडली, कानाखाली जाळ काढला…भर रस्त्यात राडा; छेड काढल्याने महिलेने होमगार्डला चोपलं

Homeguard Assault Case: एका महिलेचा होमगार्डला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

कॉलर पकडली, कानाखाली जाळ काढला...भर रस्त्यात राडा; छेड काढल्याने महिलेने होमगार्डला चोपलं
| Updated on: Jul 26, 2026 | 1:48 PM

Homeguard Assault Case: रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या होमगार्डला एका महिलेने बेदम चोपल्याची घटना घडली. छेड काढल्याचा आरोप करत महिलेने होमगार्डची कॉलर पकडून चोप दिला. कारगिल पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्गाजवळ ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत महिलेने होमगार्डची वर्दी पकडून लाथा-बुक्क्यांनी माराहण केली.

 

नेमकं काय घडलं?

संतापलेल्या महिलेने ऑन ड्युटी होमगार्डला पकडलं. त्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर महिलेने होमागार्डला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने मारहाण करण्यास सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. अनेकांनी मारहाणीची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली.

वादाचं कारण काय?

दोघांच्या भांडणावरून दोन वेगवेगळे दावे केले जात आहेत. महिलेचा दावा आहे की, होमगार्डने छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मारहाण केल्याचा दावा तिने केला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या वादाची सुरुवात होमगार्डचा महिलेला चुकून धक्का लागला. धक्का लागल्याने महिलेला राग अनावर झाला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली. भर रस्त्यातच महिलेने होमगार्डला मारहाण करण्यास सुरुवात केली.

महिलेचा चेहरा झाकलेला

या मारहाण प्रकरणात पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेचा चेहरा झाकलेला आहे. त्यामुळे पोलीस महिलेची ओळख पटवू शकलेले नाहीत. सहायक पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर लोकांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही दोन्ही पक्षाकडून तक्रार करण्यात आलेली नाही. महिलेचा देखील शोध लागलेला नाही. त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us