
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सध्या भारतालाच काय तर जगाला दिशा देत आहे. भाजपात सामील होण्याआधी नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रचारकापासून अनेक जबाबदाऱ्या निभावत आले आहे. आरएसएस सोबत त्यांच्या नात्याची मोठी कहाणी आहे.त्यात एका वकील साहेबांचाही उल्लेख करणे महत्वाचे आहे. त्यांनी मोदी यांचा संघात प्रवेश केला होता.त्यावेळी मोदी त्या वकील साहेबांचे कपडेही धुवायचे..
नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) प्रवेश देणारे वकील साहेब अन्य कोणी नाही तर लक्ष्मण राव इनामदार होत. ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला होता. लक्ष्मणराव इनामदार पुणे विद्यापीठातून वकीली शिकत होते आणि आरएसएसमध्ये प्रचारक होते. त्यामुळे संघ कार्यकर्ते त्यांना वकील साहेब म्हणून आदराने हाक मारायचे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर लावलेली बंदी ११ जुलै १९४९ रोजी हटवली गेली. बंदी हटल्यानंतर गोलवळकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली संघ महाराष्ट्राच्या बाहेर आपली मुळे पसरवू लागला. याच अंतर्गत लक्ष्मणराव इनामदार यांना गुजरातमध्ये संघटनेचे काम सोपवण्यात आले.
साल १९५८ मध्ये वकील साहेब लक्ष्मणराव इनामदार मेहसाणा जिल्ह्याच्या एका छोट्या वडनगर भागाच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांना बाल स्वयंसेवकांना संघाच्या प्रती निष्ठेची शपथ द्यावयाची होती. त्या बालस्वयंसेवकाच्या रांगेत आठ वर्षांचे नरेंद्र मोदी देखील सामील होते.
१२ वर्षानंतर तरुण नरेंद्र मोदी वडनगर येथील आपले घर सोडून अहमदाबादाल आले. आणि त्यांच्या काकाकडे कॅन्टीनचे काम करु लागले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची सायकल विकत घेत त्यावरुन चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी आपले पहिले दुकान अहमदाबादच्या गीता मंदिराजवळ लावले, जेथे संघ प्रचारक आणि स्वयंसेवकांचे येणे जाणे सुरु होते.
काही काळानंतर मोदी अहमदाबाद येथे राहणाऱ्या संघाच्या राज्य स्तरावरील नेतृत्वाच्या जवळ पोहचले. तेथे दिवंगत पत्रकार एम व्ही कामत यांनी नरेंद्र मोदी यांचे चरित्रावर लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या दुजाऱ्याने लिहीलंय की,’ त्याकाळी गुजरातच्या आरआरएस मुख्यालयात १० ते १२ लोक रहायचे. वकील साहेबांनी मला तेथे येऊन राहण्यास सांगितले. मी तेथे रोज सकाळी प्रचारक आणि अन्य कार्यकर्त्यांसाठी नाश्ता आणि चहा तयार करायतो. त्यानंतर शाखा चालवायचो. परतल्यानंतर संपूर्ण मुख्यालयात स्वच्छता करायचो. त्यानंतर स्वत:चे आणि इनामदार साहेबांचे कपडे धुवायचो.’