भारतावर टॅरिफ हटणार ? सीईएने दिले मोठे संकेत, अमेरिकेकडून मोठा दिलासा !
भारत आणि युएस ट्रेड डील संदर्भात जसजशी बोलणी पुढे जात आहेत. त्यावरुन भारतावरील टॅरिफमधून दिलासा मिळू शकतो असे वृत्त आहे. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी ही आशा व्यक्त केली आहे.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या ५० टक्के टॅरिफवर दिलासा मिळू शकतो आणि रशियाकडून इंधन खरेदीमुळे लावलेला एक्स्ट्रा २५ टक्के टॅरिफ हटवला जाऊ शकतो अशी बातमी आली आहे. मुख्य आर्थित सल्लागार व्ही.अनंथा नागेश्वरन यांनी गुरुवारी या संदर्भात आशादायक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले अमेरिका लवकरच भारतीय वस्तूंवर लावलेला अतिरिक्त टॅरिफ हटवू शकतो आणि रेसिप्रोकल टॅरिफलाही घटवून १० ते १५ टक्के केले जाऊ शकते. या सोबतच सीईएने देखील भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डीलची बोलणी पुढे सरकण्याचे संकेत दिले आहेत.
आठ ते दहा आठवड्यात निघणार तोडगा
कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना सीईए नागेश्वरन यांनी सांगितले की मला टॅरिफ प्रकरणात येत्या ८ ते १० आठवड्यात तोडगा निघण्याची आशा वाटत आहे. ते म्हणाले की मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काही महिन्यात किमान २५ टक्के एक्स्ट्रा टॅरिफवर तोडगा जरुर निघेल. बिझनस टुडे मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार नागेश्वर म्हणतात की दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापार करारा संदर्भात चांगले संकेत मिळाले आहेत. ज्यामुळे सुमारे ५० अब्ज डॉलर मुल्याच्या भारतीय निर्यातीवरील दबाव कमी होऊ शकतो.
ट्रम्प यांनी २५ टक्के एक्स्ट्रा टॅरिफ का लावला ?
भारतावर आधी अमेरिकेने २५ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता. परंतू ऑगस्टमध्ये भारताच्या रशियाकडून तेल खरेदीला युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक मदत केल्याच्या आरोप करत दंड म्हणून २५ टक्के एक्स्ट्रा टॅरिफ लावण्यात आला होता. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ वाढून ५० टक्के झाला होता. त्यामुळे ब्राझील नंतर भारत सर्वाधिक टॅरिफ झेलणारा देश बनला. आपल्या वक्तव्यात नागेश्वरन यांनी सांगितले की अमेरिका आणि भारत दोन्ही सरकारा दरम्यान अनेक मुद्द्यांचा गुंता सोडवण्यासाठी बोलणी सुरु आहेत.
भारत-US ट्रेड डीलमध्ये काय प्रगती ?
भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डील कृषी आणि डेअर प्रोडक्ट्स सह अन्य मुद्यांवर अडकली होती. त्यानंतर ट्रम्प सरकारने एक्स्ट्रा टॅरिफ लावल्यानंतर तर ही बोलणी बंद पडली. परंतू गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदी यांचा चांगला मित्र म्हणून उल्लेख केला आणि ट्रेड डिलवर यशस्वी निष्कर्ष काढण्याचे सुतोवाच केले होते.
त्यानंतर याच आठवड्याच्या सुरुवातील अमेरिकेतून ट्रेड डीलवर सहाव्या पातळीवरील बोलणी करण्यासाठी ब्रेंडेन लिंच नवी दिल्ली येथे आले. भारतीय अधिकारी राजेश अग्रवाल यांच्या सात तास चर्चा केली होती.
५५% सामानाला उच्च टॅरिफचा फटका
बातम्यानुसार सध्या अमेरिकेला भारतातून निर्यात होणाऱ्या सुमारे ५५ टक्के हिस्सा ट्रम्प यांच्या हाय टॅरिफ अंतर्गत येत आहे. याचा सर्वाधिक फटका कापड, केमिकल, मरीन फूड, जेम्स एण्ज ज्वेलरीच्यासह मशिनरीला बसणार आहे. ही उत्पादने भारताच्या श्रमप्रधान निर्यात अर्थव्यवस्थेचे प्रमुख भाग आहेत. टॅरिफचा परिणाम पाहायचा झाला तर ऑगस्ट महिन्यात अमेरिकेला होणारी निर्यात घटून ६.८६ अब्ज डॉलर झाली आहे, जी दहा महिन्यातील सर्वात कमी निर्यात आहे.
