Valentine Day : मध्य प्रदेशात शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रेमवीरांना इशारा! ‘कुछ करते दिखे बाबू-सोना, तर तोड देंगे शरीर का कोना-कोना’

| Updated on: Feb 13, 2022 | 4:45 PM

शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यासाठी काठ्यांची पूजाही केली आहे! 'भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में' अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातातील काठ्याही दाखवल्या आहेत. इतकंच नाही तर "पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना", अशा घोषणाबाजीतून त्यांनी पेमीयुगुलांना थेट इशाराच दिलाय.

Valentine Day : मध्य प्रदेशात शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रेमवीरांना इशारा! कुछ करते दिखे बाबू-सोना, तर तोड देंगे शरीर का कोना-कोना
भोपाळ शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रेमीयुगुलांना इशारा
Follow us on

भोपाळ : 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) प्रेमीयुगुल मोठ्या प्रमाणात साजरा करताना पाहायला मिळतात. मात्र सोमवारी व्हॅलेंटाईन डेला प्रेमीयुगुलांना रोखण्यासाठी मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये शिवसेना (Bhopal Shivsena) रस्त्यावर उतरली आहे. काही शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यासाठी काठ्यांची पूजाही केली आहे! ‘भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में’ अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातातील काठ्याही दाखवल्या आहेत. इतकंच नाही तर “पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना”, अशा घोषणाबाजीतून त्यांनी पेमीयुगुलांना थेट इशाराच दिलाय.

शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भोपाळ शहरातील कालिका शक्ति पीठ मंदिरात पूजा केली आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या प्रेमी जोडप्यांना इशारा दिला आहे. व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीचा भाग आहे, त्यामुळे आपण याला विरोध करत असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलं. व्हॅलेंटाईन डे चा विरोध करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते हातात लाठी घेऊन सोमवारी शहराच्या विविध भागात पोहोचतील. शहराच्या कुठल्याही भागात प्रेमीयुगुल दिसलं तर त्यांचं लग्न लावलं जाईल आणि बॅन्ड-बाजासह त्यांची वरातही काढली जाईल, असंही या शिवसैनिकांनी सांगितलं.

पब, रेस्टॉरंट, हॉटेल चालकांनाही इशारा

इतकंच नाही तर शिवसेनेकडून शहरातील पब, रेस्टॉरंट, हॉटेल चालक यांनी व्हॅलेंटाईन डे संदर्भात कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करु नये असं सांगण्यात आलं आहे. शिवसेनेसह बजरंग दल आणि अजून काही संघटनांकडून व्हेलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध केला जातो. यापूर्वी बजरंग दलाने अशाच प्रकारे प्रेमीयुगुलांचं लग्न लावून दिल्यानं ते वादात सापडले होते.

महाराष्ट्रातही हिंदूराष्ट्र सेना आक्रमक

जळगावमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचाही व्हॅलेंटाईन डे वरुन प्रेमीयुगुलांना इशारा

दुसरीकडे महाराष्ट्रातही व्हेलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावात हिंदूराष्ट्र सेनेनं प्रेमीयुगुलांना इशारा दिलाय. हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते शहरातील उद्याने, महाविद्यालयांसह पर्यटनाच्या ठिकाणी रॅली काढत तरुणांचं प्रबोधन करणार आहेत. व्हॅलेंटाईन डे साजरा करणं ही पाश्चात्य कूप्रथा आहे. ती बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन प्रबोधन करण्यात येणार आहे. सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात येईल. शहरातील महाविद्यालये, सार्वजनिक उद्याने, मेहरून तलाव, लांडोरखोरी परिसर कोल्हे हिल्स, हनुमान खोरे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जाऊन तरुणांमध्ये प्रबोधन करण्यात असल्याची माहिती या संघटनेकडून देण्यात आलीय. यावेळी व्हॅलेंटाइन डे साजरा करताना प्रेमीयुगुल आढळून आल्यास त्यांचा जागेवरच विवाह लावून देण्यात येईल असा इशारा हिंदूराष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनी दिलाय.

इतर बातम्या :

Hijab Row: इंशा अल्लाह! एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल; ओवैसी

भाजपने आघाडी सरकार पाडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा; शंभुराज देसाई यांनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली