Virat Kohli : न्यूझीलंड विरुद्ध धावांचा पाऊस पाडूनही विराट कोहलीसाठी वाईट बातमी, आठवड्याभराच्या आत आनंद हिरावला
Virat Kohli : अखेर विराट कोहलीच्या बाबतीत भिती होती तेच झालं. न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये त्याने एक शतकी आणि एक अर्धशतकी खेळी केली. इतकं जबरदस्त खेळूनही विराटच्या नशिबी जे सुख यायला हवं होतं, ते आलेलं नाही. भारतीय क्रिकेट चाहतेही यामुळे दु:खात आहेत.

Virat Kohli ICC Ranking : वनडे फलंदाजांची ताजी रँकिंग आयसीसीने प्रसिद्ध केली आहे. विराट कोहलीसाठी वाईट बातमी आहे. नव्या रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर 1 फलंदाज राहिलेला नाही. त्याच्याजागी भारताविरुद्ध वनडे सीरीजमध्ये 352 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल वनडेमध्ये नंबर वन फलंदाज बनला आहे. ताज्या रँकिंगमध्ये डॅरेल मिचेलच्या रेटिंग पॉइंटने बंपर उसळी घेतली आहे. नंबर 1 वरुन नंबर 2 बनलेल्या विराटच्या रेटिंग पॉइंटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल 845 रेटिंग पॉइंटसह वनडेमधील नंबर 1 फलंदाज बनला आहे. त्याच्या रेटिंगमध्ये 51 पॉइंटची उसळी आहे. मागच्या रँकिंगमध्ये तो 794 रेटिंग पॉइंटसह वनडे फलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर होता.
विराट कोहली मागच्या रँकिंगमध्ये 795 रेटिंग पॉइंटसह वनडेमध्ये नंबर 1 फलंदाज होता. ताज्या रँकिंगमध्ये त्याचे 795 रेटिंग पॉइंट आहेत. पण तो दुसऱ्या नंबरवर आहे. विराट कोहली मागच्याच आठवड्यात रोहित शर्माला मागे टाकून नंबर 1 फलंदाज बनला होता. पण डॅरेल मिचेलने एका आठवड्यात त्याच्याकडून नंबर 1 ची खुर्ची हिरावून घेतली.
टॉप 5 पैकी 3 फलंदाज भारतीय
ICC च्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये विराट कोहलीची नंबर 1 पोजिशन गेल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना दु:ख जरुर झालं असेल. एक मोठी बाब ही आहे की, नव्या रँकिंगमध्ये टॉप 5 पैकी 3 फलंदाज भारतीय आहेत. विराट कोहली नंबर 2 च्या पोजिशनवर आहे. त्याशिवाय रोहित शर्मा चौथ्या आणि शुबमन गिल 5 व्या नंबरवर आहे.
अय्यरसाठी बॅड न्यूज
विराट, रोहित आणि गिल टॉप 5 मध्ये आहे. केएल राहुल सुद्धा एका स्थानाची झेप घेत टॉप 10 मध्ये पोहोचला आहे. नव्या रँकिंगमध्ये केएल राहुल 11 व्या वरुन 10 व्या नंबरवर आला आहे. केएल राहुलने 10 व्या नंबरवर श्रेयस अय्यरची जागा घेतली आहे. अय्यर 10 व्या वरुन 11 व्या नंबरवर गेला आहे.
