AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hijab Row: इंशा अल्लाह! एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल; ओवैसी

कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण राज्या राज्यांमध्ये पसरलेले असतानाच आता या वादात एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे. इंशा अल्लाह, एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Hijab Row: इंशा अल्लाह! एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल; ओवैसी
इंशा अल्लाह! एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल; ओवैसी
| Updated on: Feb 13, 2022 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली: कर्नाटकातील हिजाब  (Hijab) वादाचे लोण राज्या राज्यांमध्ये पसरलेले असतानाच आता या वादात एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उडी घेतली आहे. इंशा अल्लाह, एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. ओवैसी यांनी ट्विट करून हिजाब वादावर ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हिजाबचा वाद केवळ कर्नाटकपर्यंत मर्यादित राहिला नाही. महाराष्ट्रातही (maharashtra) त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यातील अनेक भागात निदर्शने करण्यात आली आहेत. काही ठिकाणी हिजाब डेही पाळण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हिजाबच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्येही हिजाबच्या आंदोलनावेळी लाठीमार करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ओवैसी काय म्हणाले?

मुली आई-वडिलांना म्हणतील मला हिजाब परिधान करायचं आहे. आई-वडीलही मुलींना परवानगी देतील आणि म्हणतील, तू बिनधास्त हिजाब परिधान कर. बघू तुला कोण अडवतो. हिजाब परिधान करूनच मुली डॉक्टरही होतील. कलेक्टरही होतील. बिझनेस वुमनही होतील. एसडीएणही होतील. इंशा अल्लाह, एक दिवस हिजाबी पंतप्रधानही होईल. कदाचित त्यावेळी हे बघायला मी जिवंत नसेल. पण हिजाबी एक दिवस पंतप्रधान जरुर होईल, असं ओवैसी म्हणाले.

हा तर संवैधानिक हक्क

यापूर्वीही ओवैसी यांनी हिजाबचं समर्थन केलं होतं. हिजाब परिधान करा किंवा अंगावर चादर घ्या हा तुमचा अधिकार आहे. संविधानाने दिलेला अधिकार आहे. पुट्टास्वामी यांचं जजमेंट आहे. त्यातही अधिकार देण्यात आला आहे. हीच आमची ओळख आहे. हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्यांना खडसावल्याबद्दल मी त्या मुलीचं अभिनंदन करतो. तुम्ही घाबरू नका. कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब परिधान करू शकतात, असं ओवैसी यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

Hijab : कर्नाटक हायकोर्टाचा हिजाबवाल्यांना पहिला झटका, कोर्ट म्हणालं, निकाल येईपर्यंत ‘नो’ धार्मिक पोषक

भाजपने आघाडी सरकार पाडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा; शंभुराज देसाई यांनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजायचे; जितेंद्र आव्हाडांचं ओबीसी मेळाव्यात विधान

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...