AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Express ने गाठला ताशी 180 km चा वेग, कुठे घडली घटना ?

वंदेभारत एक्सप्रेसने चाचणीत दर ताशी १८० किमी वेगाचा टप्पा गाठला आहे. ही ट्रेन चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली आहे.

Vande Bharat Express ने गाठला ताशी 180 km चा वेग, कुठे घडली घटना ?
vande bharat express news
| Updated on: Oct 13, 2026 | 10:05 AM
Share

वंदेभारत एक्सप्रेस ही भारताची सेमी हायस्पीड ट्रेन अनेक मार्गांवरुन देशात धावत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासाची संधी मिळाली आहे. या ट्रेनचे तिकीट महाग असले तरी भारताच्या वाढत्या मध्यम वर्गासाठी ही ट्रेन वरदान ठरली आहे. आता या वंदेभारतने ताशी १८० किमी वेगाचा टप्पा गाठला आहे. वंदेभारत एक्सप्रेसने नेमका कुठे हा टप्पा गाठला हे पाहूयात….

वंदेभारत एक्सप्रेस ही आता मध्यम वर्गीयांची आवडती ट्रेन बनली आहे. या वंदेभारत ट्रेनने आता ताशी १८० किमी वेगाचा टप्पा गाठला आहे. वंदेभारत चेअर कारने मथुरा-नागदा सेक्शनमध्ये हा ताशी १८० किमी वेगाचा टप्पा गाठला आहे. १६ डब्यांची ही ट्रेन पंजाबच्या कपुरतला रेले कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थितीत ही चाचणी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात आली आहे. propulsion system ने सुसज्ज असलेल्या या ट्रेनसेटची उच्च-वेगातील कामगिरी, कार्यान्वयीन कार्यक्षमता आणि सुरक्षितता यांबाबत चाचणी करण्यात आली आहे. ही भारताच्या आधुनिक रेल्वे निर्मितीच्या प्रवासातील एक महत्त्वाची घटना म्हटली जात आहे.

CCRS तपासणीची यशस्वी पूर्णता हा प्रगत ‘वंदे भारत’ ट्रेनसेट्सच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे, त्यातून भारतातील आधुनिक रेल्वे निर्मिती क्षेत्रातील वाढती क्षमता लक्षात येते. जरी वंदेभारत चेअर कारची ताशी १८० किमी वेगाने चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असली तरी नियमित प्रवासात ही ट्रेन या वेगाने धावेलच असे नाही.

वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसच्या चाचण्या सुरु

सध्या वंदे भारत एक्सप्रेस दर ताशी १३० ते १६० किमी वेगाने धावत आहे. परंतू रेल्वे रुळांची क्षमता वाढल्यानंतर वंदेभारत एक्सप्रेस भविष्यात १८० वेगाने देखील चालवता येऊ शकते असे म्हटले जात आहे. सध्या देशभरात १०० हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत. तसेच देशाची पहिली वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसच्या चाचण्या सुरु असून ती देखील लवकरच सेवेत दाखल होत आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान