मुस्लिम कुटुंबाच्या घराच्या नेम प्लेटवर ‘वंदे मातरम’ लिहिलेलं म्हणून इमामाचा निकाह लावण्यास नकार

इमामाला कारण विचारलं तेव्हा तो बोलला की, लग्न असलेल्या घराच्या नेम प्लेटवर वंदे मातरम आणि जय हिंद सारखे शब्द लिहिलेले आहेत. त्यामुळे तो निकाह वाचन करणार नाही.

मुस्लिम कुटुंबाच्या घराच्या नेम प्लेटवर वंदे मातरम लिहिलेलं म्हणून इमामाचा निकाह लावण्यास नकार
Nikah
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 5:36 PM

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यात एका युवतीच्या लग्नात इमामाने निकाह वाचन करण्यास नकार दिला. कारण युवतीच्या घराच्या नेम प्लेटवर वंदे मातरम लिहिलेलं होतं. त्या शिवाय देशभक्तीपर अनेक घोषणा लिहिलेल्या होत्या. हे प्रकरण समोर येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी इमामाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतलं आहे. अपर पोलीस अधीक्षक देवेंद्र कुमार यांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली. मोनीस भगत यांच्या बहिणीचं लग्न 15 नोव्हेंबरला होतं. निकाहची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर मशिदीत राहणाऱ्या इमाम सुरखान यांना बोलवण्यात आलं.

पण त्यांनी निकाह वाचन करण्यास नकार दिला. इमामाला कारण विचारलं तेव्हा तो बोलला की, लग्न असलेल्या घराच्या नेम प्लेटवर वंदे मातरम आणि जय हिंद सारखे शब्द लिहिलेले आहेत. त्यामुळे तो निकाह वाचन करणार नाही. देवेंद्र कुमार यांनी सांगितलं की, इमामाचे आक्षेप समजून घेतल्यानंतर त्याला बरच समजावण्यात आलं. परंतु इमामाने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे दुसरे इमाम शफीक खान यांना बोलावण्यात आलं. त्यांनी निकाह वाचन केलं.

Loading...

1937 साली कोणाचा आक्षेप होता?

पोलीस आरोपी इमाम सूरखानला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. वंदे मातरम बद्दल मुस्लिमांच्या एका वर्गात मतभेद आहेत. काही लोक या गीतामधील शब्द इस्लाम धर्माच्या विरोधात आहेत असं मानतात. म्हणून हे गीत गायला नकार देतात. 1937 साली काँग्रेसने राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये गीताची दोन कडवी गाण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला. त्यावेळी सुद्धा मुस्लीम लीग आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी आक्षेप नोंदवलेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us