AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalita Pawar : नवऱ्याच्या अनैतिक संबंधांबद्दल समजताच प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न; फिरले नशिबाचे फासे अन्…तीन दिवस सडत होता मृतदेह

Lalita Pawar : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं नवऱ्याच्या अफेअरबद्दल समजताच दुसरं लग्न केलं. मात्र, अभिनेत्रीला शेवटी एकाकी आयुष्य जगावं लागलेलं.

Lalita Pawar : नवऱ्याच्या अनैतिक संबंधांबद्दल समजताच प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न; फिरले नशिबाचे फासे अन्...तीन दिवस सडत होता मृतदेह
| Updated on: Nov 20, 2026 | 5:27 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीनं असे अनेक कलाकार पाहिले आहेत, ज्यांचं आयुष्य अशा संकटांनी भरलेलं होतं की, त्यांना रात्रंदिवस अडचणींचा सामना करावा लागला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीची कहाणी सांगणार आहोत, जिचं नशीब अत्यंत दुर्दैवी होतं. तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली, पण तिचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखात गेलं.

आपण प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ललिता यांनी वयाच्या नवव्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी 1928 मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्या ‘हिम्मत-ए-मर्दान’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. 1940 च्या दशकात, त्या अनेक मूकपटांमध्ये दिसल्या. दरम्यान, एका अपघातानं सर्व काही बदलून टाकलं. 1942 मध्ये त्यांना चंद्रराव यांच्या ‘जंग-ए-आझादी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्ये भगवान दादा ललिता यांना कानशिलात मारणार असा सीन होता. सर्व तयारीनंतर, भगवान दादांनी ललिता यांना इतकी जोरात कानशिलात मारली की त्या बेशुद्ध झाल्या. सुरुवातीला लोकांना वाटलं की ललिता एक सीन असल्यामुळे बेशुद्धीचं नाटक करत आहेत, पण, नंतर त्यांच्या कानातून रक्त येत असल्याचं सगळ्यांचं लक्षात आलं. अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका वैद्यकीय चुकीमुळे ललिता यांच्या शरीराची उजवी बाजू लुळी पडली. यामुळे त्यांच्या डोळ्यालाही इजा झाली. याचा परिणाम म्हणून अभिनेत्रीला अनेक चित्रपट गमवावे लागले.

या अपघातानं सर्व काही बदलून टाकलं. पण ललिता यांनी हार मानली नाही आणि काही वर्षांनंतर, 1948 मध्ये ‘गृहस्थी’ या चित्रपटातून एका अंध डोळ्यानं पुनरागमन केलं. त्यांनी खलनायिकेच्या भूमिका साकारल्या. ललिता यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण‘ मालिकेतही मंथराची भूमिका साकारली. ललिता यांनी केवळ त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतच चढ-उतार अनुभवले नाहीत, तर त्यांचं वैयक्तिक आयुष्यही अडचणींनी भरलेलं होतं. ललिता यांचं लग्न निर्माते गणपतराव पवार यांच्याशी झालं होतं. पण, जेव्हा ललिता यांना कळलं की त्यांच्या पतीचं त्यांच्याच धाकट्या बहिणीसोबत अनैतिक संबंध आहेत, तेव्हा या लग्नात अडचणी निर्माण झाल्या. या घटनेमुळे ललिता पूर्णपणे खचून गेल्या आणि त्यांनी गणपतराव यांना सोडून चित्रपट निर्माता राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केलं, ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला.

ललिता पवार यांचा मृत्यू

ललिता पवार यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्यानंतर हळूहळू त्यांचं आयुष्य चार भिंतींपुरतंच मर्यादित राहिलं. पुण्यातील त्यांच्या ‘आरोही’ या बंगल्यात ललिता यांनी अखेरचा श्वास घेतला. 1998 साली याच बंगल्यात ललिता यांचं निधन झाले. त्यावेळी तिथं कोणीही उपस्थित नव्हतं. त्यांचे पती रुग्णालयात दाखल होते आणि त्यांचा मुलगा मुंबईत त्याच्या कुटुंबासोबत होता. ललिता यांच्या मृत्यूनंतर तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात सडतच राहिला आणि त्यांच्या मुलानं फोन केल्यावरच हे लक्षात आलं. नंतर, पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा तोडून पाहिलं तर ललिता यांचा मृतदेह आढळला.

Follow Us
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!