VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

नवीन पिढी घडण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. शासनाला जरब बसली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप शासनाचा काहीही निर्णय आलेला नाही. त्यामुळे 23 तारखेचा महाराष्ट्र बंद हा होणारच आहे, असे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या महाराष्ट्र बंदला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!
prakash ambedkar and abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 3:19 PM

Delhi CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी, तरुण जंतर मंतरच्या मैदानावर जमा झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणारच, अशी सीजेपीने ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस, ठाकरे, गट, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, आता या महाराष्ट्र बंदचे नियोजन कसे आहे? तसेच या बंदला कोणी-कोणी पाठिंबा दिला. याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदवर सविस्तर भाष्य केलं. सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनांला एवढं घाबरलं आहे की आता केंद्र सरकारने टेरीटोरीयल आर्मी तैनात केली आहे. आमच्या बंदला डाव्या पक्षांनी पाठिबा दिला आहे. शिक्षण संस्थांनीही आमच्या बंदला पाठिंबा दिलाय. राज्यातील कोचिंग क्लासेसही आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाला

तसेच, हा बंद यशस्वी व्हावा यासाटी कामगार संघटना, बेस्ट संघटना, बीएमसीच्या संघटना, व्यापारी संघटनांशी आमचे बोलणे सुरू आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये चीड आहे. अनेक संघटना महाराष्ट्र बंदमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

भाजप सोडून सर्व पक्षांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं

दिल्लीतील आंदोलन चिरडण्यासाठी काश्मीर येथील राखीव बलही बोलवण्यात आलंय. सरकारच्या या धोरणाला आमचा विरोध आहे. सरकारने आंदोलकांवर अश्रूधूर सोडू नये, लाछीचार्ज करू नये यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आम्ही भाजप सोडून सर्व पक्षांना महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. या बंदमध्ये प्रत्येकानेच सहभागावी व्हावं. आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत, हे सांगितले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

23 तारखेचा महाराष्ट्र बंद हा होणारच

नवीन पिढी घडण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. शासनाला जरब बसली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप शासनाचा काहीही निर्णय आलेला नाही. त्यामुळे 23 तारखेचा महाराष्ट्र बंद हा होणारच आहे. राहुल गांधी यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करावं, असं माझं मत आहे. हे आंदोलन आमचं नाही. भाजपच्या विद्यार्थी संघटनेनेही सहभागी व्हावं, असही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Follow Us