AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या विजयला 10 वी मध्ये किती मार्क्स होते? मार्कशीट समोर

Vijay 10th Marks : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील यशामुळे विजयच्या वैयक्तिक आयुष्याबाबत वेगवेगळी चर्चा रंगू लागली आहे. अशातच आता विजयची 10वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या विजयला 10 वी मध्ये किती मार्क्स होते? मार्कशीट समोर
Vijay 10th MarksImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 06, 2026 | 7:20 PM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने शानदार कामगिरी केला आहे. हा पक्ष 108 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता विजयने राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या निवडणुकीतील यशामुळे विजयच्या वैयक्तिक आयुष्याबाबत वेगवेगळी चर्चा रंगू लागली आहे. अशातच आता विजयची 10वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात त्यांना कोणत्या विषयाला किती मार्क्स होते याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विजयच्या शिक्षणाचा प्रवास

विजय यांनी चेन्नईतील कोडंबक्कम येथील फातिमा स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी विरुगंबक्कममधील बालालोक स्कूलमध्ये शिक्षण सुरू ठेवले. हायस्कूलनंतर त्यांनी लोयोला कॉलेज चेन्नईमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला, मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी कॉलेज अर्धवट सोडले. मेहनतीच्या जोरावर ते एक यशस्वी अभिनेता बनले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मार्कशीटमध्ये विजय यांना 10वी बोर्ड परीक्षेत 1100 पैकी 711 गुण मिळाले होते. म्हणजेच त्यांना सुमारे 65% मार्क्स मिळाले होते. याचाच अर्थ ते एक सरासरी विद्यार्थी होते. त्यांना कोणत्या विषयात किती मार्क्स होते ते जाणून घेऊयात.

विजय यांना कोणत्या विषयात किती मार्क्स

  • तमिळ: 200 पैकी 155
  • इंग्रजी: 200 पैकी 133
  • विज्ञान: 300 पैकी 206
  • सामाजिक शास्त्र: 200 पैकी 122
  • गणित: 200 पैकी फक्त 95

चित्रपटसृष्टीतून राजकारणात

तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर विजय आता पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट जना नारायण हा त्यांचा शेवटचा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात पूजा हेगडे नायिकेच्या भूमिकेत असून बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात प्रकाश राज गौतम वासुदेव मेनन, ममिता बैजू या कलाकारांनीही महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे.

खास संदेश

विजय यांचा प्रवास दाखवतो की सरासरी गुण मिळवणारे विद्यार्थीही मेहनत आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास मोठे यश मिळवू शकतात. त्यामुळे कमी गुण आल्यास निराश होण्याची गरज नाही. योग्य दिशेने सातत्याने काम केल्यास यश नक्की मिळते.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली