AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव वाचून सलाम ठोकाल!

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव वाचून सलाम ठोकाल!
thalapathy vijay father s a chandrasekharImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 7:12 PM
Share

Thalapathy Vijay  Father S A Chandrasekhar : अभिनेता थलापती विजय आज संपूर्ण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या टीव्हीके या पक्षाने तामिळनाडूत दमदार कामगिरी केली असून विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकून हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 2024 साली विजय यांनी टीव्हीके हा प क्ष स्थापन काल होता. त्यांच्या सभा, रॅलींना हजारोंनी गर्दी व्हायची. दरम्यान, आता हीच गर्दी विजयच्या पाठीमागे उभी राहिली असून लवकरच ते मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान, आज विजय यांची सगळीकडे चर्चा होत असली तरी विजय यांना या यशापर्यंत घेऊन जाणारे हात वेगळेच आहेत. त्या एका व्यक्तीने विजय यांना अगदी लहाणपणापासून घडवलं, त्यांच्या करिअरचा मार्ग नेहमीच प्रशस्त कसा राहील ते पाहिलं. त्याचाच परिणाम म्हणून आज विजय हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत.

कोण आहे ही व्यक्ती?

विजयला अभिनय तसेच राजकारण या दोन्ही क्षेत्रात यशस्वी करणारी व्यक्ती अन्य कोणी नसून खुद्द विजय यांचे वडील आहेत. विजय यांच्या वडिलांचे नाव एस. ए. चंद्रशेखर असे आहे. विजय यांना त्यांनी लहाणपणापूसनच योग्य संस्कार दिले. एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. त्यांनीच विजय यांना अभिनेता म्हणून पुढे आणले. वयाच्या 10 व्या वर्षापासून विजय यांनी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली होती. आज विजय तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहेत.

विजय राजकारणात कसे आले?

विजय यांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावे, असे चंद्रशेकर यांना नेहमी वाटायचे. चंद्रशेखर यांनी चित्रपटांच्या माध्यमातून विजय यांचा राजकारणातील मार्ग प्रशस्त करून ठेवला. विजय हेदेखील आपल्या चाहत्यांना सोबत घेऊन सामाजिक आणि राजकीय कामात सक्रीय झाले. पुढे विजय आणि चंद्रशेखर यांच्यात वैचारिक मतभेदही झाले. त्यांनी विजय यांच्या फॅन क्लबचे रुपांतर राजकीय पक्षात करण्याचा प्रयत्न केला. त्याला विजय यांनी विरोध केला होता. नंतर मात्र 2024 साली विजय यांनी स्वत:चा टीव्हीके पक्ष काढला. आता याच टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विजय यांच्या वडिलांनीही खूप मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता विजय हे लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल