यार तू तर खूपच स्मार्ट आहेस, गर्लफ्रेंड… करोडपती घरातील सून नोकरावरच भाळली? आता…

उत्तर प्रदेशातील कोट्यधीश विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. त्यांची सून शालूने नोकर विशालला पाठवलेला एक ‘स्मार्ट’ मेसेज पोलिसांच्या हाती लागला आहे. या चॅटमधून त्यांच्या जवळच्या संबंधांचा अंदाज येतो. कौटुंबिक निर्बंध आणि पैशाच्या वादामुळे शालूनेच हत्येचा कट रचला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

यार तू तर खूपच स्मार्ट आहेस, गर्लफ्रेंड... करोडपती घरातील सून नोकरावरच भाळली? आता...
Vineet Minocha
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 5:34 PM

उत्तर प्रदेशातील कोट्यधीश औषध व्यापारी विनीत मिनोचा हत्याकांडात रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचे पाळेमुळे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आता पोलिसांच्या हाती एक चॅट लागला आहे. विनीत मिनोचा यांची सून शालूने तिच्या नोकराला पाठवलेला हा मेसेज आहे. यात ती नोकराच्या सौंदर्याची तारीफ करताना दिसत आहे. दरम्यान, शालूने तिच्या मोबाईलमधील असंख्य चॅट डीलिट केलेले आहेत. पोलीस आता हे सर्व चॅट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत असून यातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

शालूने तिचा नोकर विशालला व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवला होता. यार, तू खूपच स्मार्ट आहे, तुला एखादी गर्लफ्रेंड आहे की नाही? तू अजूनपर्यंत लग्न का केलं नाहीस?, असा मेसेज शालूने विशालला पाठवला होता. पोलिसांना विशालच्या मोबाईलमध्ये हा मेसेज सापडला. यावरून विशाल आणि शालू एकमेकांच्या किती जवळ होते याचा अंदाज येतो. कॉल डिटेलनुसार, शालूने विशालशी 30 वेळा फोन केला होता. तर तिचा नवरा सुब्रतने विशालला 300 वेळा फोन केला होता. हे फोन कॉल एक ते दीड मिनिटाचे आहेत. गेल्या 21 दिवसातील हे फोन कॉल्स आहेत. या 21 दिवसात त्यांची काय काय चर्चा झाली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच शालू आणि विशालचे काही संबंध होते का? याचाही पोलीस तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आमच्या बहिणीविषयी…

दुसरीकडे शालूच्या बहीण आणि भावाने मीडियात येऊन शालूची बाजू लावून धरली आहे. आमच्या बहिणी विषयी निगेटिव्ह नरेटिव्ह चालवला जात आहे. आमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे. आम्ही चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहात आहोत, असं तिच्या बहीण आणि भावाचं म्हणणं आहे. तर शालूचा नवरा सुब्रत यांनीही शालू अशा प्रकारचं कृत्य करणार नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या चौकशीत सर्व समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याणपूर येथील रतन ऑर्बिट अपार्टमेंटचं हे प्रकरण आहे. विनीत मिनोच या व्यापाऱ्याची फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती. ही घटना घडली तेव्हा त्यांचा मुलगा, सून आणि नातू बाहेर होते. हे सर्वजण जेव्हा घरी आले तेव्हा विनीत यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि त्यांना धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या सीसीटीव्हीत पोलिसांना दोन जण फ्लॅटमध्ये घुसताना दिसले. त्यातील एक विनीत यांचा जुना नोकर विशाल होता. सहा वर्षापूर्वी विशाल हा विनीत यांच्याकडे काम करत होता. चोरीच्या आरोपातून त्याला त्यावेळी कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतरही मिनोच कुटुंब विशालच्या संपर्कात होतं.

पोलिसांच्या मते, विशाल ड्युप्लिकेट चावीने फ्लॅटमध्ये आला होता. विनीत यांची सून आणि मुलगा घराच्याबाहेर निघताच विशालने त्याच्या साथीदारासोबत घरात प्रवेश केला. दोघंही घरात विनीत यांच्या येण्याची वाट पाहत होते. विनीत येताच त्यांनी त्यांचा काढा काढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोडपती घरची सून असूनही शालूला घर खर्चासाठी कमी पैसे मिळत होते. तिला पार्ट्यांना जायला बंदी होती. शिवाय उठसूट तिला टोमणे मारले जात होतं. त्यामुळे शालू वैतागली होती. त्या रागातूनच तिने सासऱ्याला संपवण्याचा प्लान तयार केला. यात तिने विशालची मदत घेतली. तिनेच विशालला घराची ड्युप्लिकेट चावी बनवून दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us