
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे वक्फच्या विरोधात सुरु असलेला हिंसाचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी वक्फ कायद्याविरोधात सुती येथे हिंसाचार झाला. सरकारी बसेसना आग लावण्यात आली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ताज्या माहितीनुसार स्थिती असून नियंत्रणात आलेली नाही.
याआधी रघुनाथगंजच्या उमरपुरमध्ये दोन पोलिसांच्या वाहनांना आग लावली होती. भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ सुतीमध्ये लागू करण्यात आले आहे. तरीही निदर्शने सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 निदर्शकांनी बंद पाडले आहे. ट्रेनची वाहतूक देखील थांबविण्यात आली आहे. सुती येथील साजुर चौकात एका सरकारी बसला देखील आग लावण्याची घटना घडली आहे.
वक्फ अधिनियमच्या विरोधात गेल्या दिवस मुर्शिदाबाद पेटलेले आहे. राज्याच्या विविध भागात हिंसाचार सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. सुती आणि शमसेरगंज परिसरातील हजारो लोकांच्या मोर्चा काढण्यात आला आहे. त्यांनी साजुर चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ बंद पाडण्यासाठी हिंसाचार केला, परंतू पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले आहे. या वेळी काही निदर्शकांनी बॉम्ब फेकल्याचे कथितरित्या म्हटले जात आहे. तसेच निदर्शकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांवर विटा आणि दगड फेकल्याने अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.
भाजपाचे आमदार गौरीशंकर घोष यांनी या आधीच भविष्यवाणी केली होती की वक्फ विधेयक पारित झाल्यानतर येथे स्थिती चिंताजनक होऊ शकते. ते म्हणाले की लोक घाबरलेले आहेत. सोशल मीडियावरील विभिन्न पोस्ट पाहून आम्ही घाबरलो आहोत. वक्फ विधेयकाविरुद्ध मुर्शिदाबाद येथे पुन्हा अशांततेचे वातावरण पसरु शकते असेही त्यांनी म्हटले आहे.
येथे पोस्ट पाहा –
Mamata Banerjee has completely failed to maintain law and order in West Bengal. Violent anti-Waqf protests have brought the state to a standstill. In Murshidabad, several express trains are being blocked, passengers are stranded, terrified, and rail premises have turned into war…
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) April 11, 2025
प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय राज्य मंत्री सुकांत मजूमदार यांनी सीएम ममता बनर्जीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की ममता बनर्जी पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखण्यास संपूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत.वक्फ विरोधी हिंसक निदर्शनाने राज्याला ठप्प केले आहे. मुर्शिदाबाद येथे अनेक एक्सप्रेस ट्रेन रोखण्यात आल्या आहेत. प्रवासी जागोजागी अडकले आहेत. घाबरलेले आहेत, रेल्वे परिसर युद्ध क्षेत्र बनले बनले आहेत असेही सुकांत मजूमदार यांनी म्हटले आहे.
हे पहिल्यांदाच झालेले आहे असे नाही. राज्यात सीएए विरुद्ध अशाच प्रकाराची निदर्शने झाली होती आणि मुख्यमंत्री काय करत आहेत. काहीच नाही त्यांचे मौन निंदनीय आहे. यावरुन हे स्पष्ट होते की हिंसा भले त्यांच्या आशीवार्दाने झालेली नसेल मात्र त्यांना लपवून होत नाहीए, त्यांना हिंसाचाराची पुरेपुर कल्पना आहे. ते म्हणाले हे प्रशासन नाही. हे राजकीय लाभासाठी उग्रवादासमोर आत्मसमर्पण आहे. या संकटासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली पाहीजेच…