
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अखेर आज सायंकाळी नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आलिंगन देऊन जोरदार स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्र यांच्या जाचक टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर दोन मोठ्या राष्ट्रांच्या सर्वाच्च नेत्यांची बैठक होत असल्याने जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. या दोन्ही देशात आता कोणते करार होतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पुतिन २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात आले आहेत. व्लादिमीर पुतिन ३० तास भारतात रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशात विविध करार होणार आहेत.
रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. त्यातच भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केलेला असून त्यात रशियाशी तेल खरेदी केल्यानेही अमेरिकेने अधिकचा टॅरिफ लावलेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात काय करार होणार याकडे लक्ष लागले आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन भारतात दाखल झाले असते. नवी दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमध्ये स्वार होत पीएम यांचे निवासस्थान गाठले आहेत. पुतिन यांच्या स्वागतासाठी पीएम मोदी यांनी आज रात्री प्रायव्हेट डीनरचे आयोजन केले आहे.
येथे पाहा पोस्ट –
#WATCH | Prime Minister Narendra Modi and Russian President Vladimir Putin travel in the same car, as they depart from the Palam Technical Airport in Delhi
President Putin is on a two-day State visit to India. He will hold the 23rd India-Russia Annual Summit with PM Narendra… pic.twitter.com/7Qz2cHOtnx
— ANI (@ANI) December 4, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या प्रकारे प्रोटोकॉल तोडून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत केले त्यामुळे रशियाचे अधिकारी देखील चकीत झाले आहेत. रशियाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे की आम्हाला माहिती नव्हते मोदी स्वत: विमानतळावर उपस्थित राहतील.
दोन्ही देशांमध्ये क्रूड ऑईल खरेदी करार, संरक्षण आणि मुक्त व्यापार करार (एफटीए) यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.पुतिन यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशात कोणते संरक्षण आणि व्यापारी करार होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. रशियाची Su-57 लढाऊ विमाने आणि सध्याची एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टीम, भविष्यातील S-५०० मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पुढील आवृत्ती आणि दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रितपणे संरक्षण साहित्या आणि युद्धनौका तयार करण्यासारख्या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.