
नवी दिल्ली : Voice of Global South Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटचे उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सहभागी पश्चिम देशांना बंधू म्हणून संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपला उद्देश जगभरात दक्षिण देशांची आवाज वाढवण्याचा आहे. भारताने आपल्या विकासाची रणनीती नेहमी दक्षिण देशांशी शेअर केली आहे. गेली दोन वर्ष कोरोना व जागतिक परिस्थितीचे संकटे आपल्यासमोर होती. ही संकटे दक्षिणी देशांनी बनवले नाही. परंतु त्याचा सर्वाधिक परिणाम दक्षिणी देशांवर झाला. या शतकात आपण आपली नवीन व्यवस्था बनवली पाहिजे. ज्यामुळे आपल्या नागरिकांचे कल्याण होईल. तुमचा आवाज भारताचा आवाज आहे आणि तुमची प्राथमिकता भारताची प्राथमिकता आहे.”
व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटनपर भाषण ‘जागतिक दक्षिणेचा आवाज: मानव-केंद्रीत विकास’ या विषयावर झाले. यावेळी ते म्हणाले, “भारताकडे G20चे अध्यक्षपद आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दक्षिण देश मोठी भूमिका बजावू शकतात. आता जगाला दक्षिण देशांची एकता दाखवून त्यांचासमोर जागतिक अजेंडा ठेवण्याची गरज आहे. २० व्या शतकात जगाची सूत्र विकसित देशांकडे होती. परंतु आज अनेक विकसित देशांची अर्थव्यवस्था मंदीच्या आव्हानाला सामोरे जात आहे. आता २१ वे शतक दक्षिण देशांचे असणार आहे. जर आम्ही एकत्र येऊन काम केल तर जगाचा अजेंडा तयार करु शकतो.” ही परिषद ‘युनिटी ऑफ व्हॉईस, युनिटी ऑफ पर्पज या थीम अंतर्गत,’ होत आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी १२० हून अधिक देशांना आमंत्रित केले गेले आहे.
परिषदेत किती सत्र होणार :
शिखर परिषदेत दहा सत्रे होणार आहेत. १२ जानेवारीला चार सत्रे आणि १३ जानेवारीला सहा सत्रे होणार आहेत. प्रत्येक सत्रात १० ते २० देशांचे नेते किंवा मंत्री सहभागी होणार आहे.
परिषदेची काय आहे वैशिष्ट :