Voter Card | निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये! मतदार यादीत नाही तुमचे नाव? असे झटपट करा चेक

| Updated on: Mar 19, 2024 | 4:02 PM

Voter Card | भारतीय निवडणूक आयोग बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी सातत्याने मतदार यादी अपडेट करते. या दरम्यान चाचपणीत काही नावं दुसऱ्यांदा आढळली अथवा काही त्रुटी आढळल्यास मतदारांच्या यादीतून उडविण्यात येतात. तुमचे नाव या यादीत आहे की नाही, हे तुम्हाला चेक करता येते.

Voter Card | निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये! मतदार यादीत नाही तुमचे नाव? असे झटपट करा चेक
कसे शोधणार मतदार यादीत नाव
Follow us on

नवी दिल्ली | 19 March 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चा बिगूल वाजला आहे. या निवडणूक हिंसाचारमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. अनेकदा एकच मतदार दोन मतदार संघात आढळतो. पूर्वी हा प्रकार सर्रास होत होता. तर बोगस मतदानाचे प्रमाण पण मोठे होते. त्यामुळे आता आधार कार्ड आणि मतदार कार्ड यांचे इंटरलिंक करण्यात आले आहे. तरीही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी बोगस मतदारांची नावे मतदान यादीतून हटवली आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे. पण या प्रक्रियेदरम्यान कधी कधी काही मतदारांचे नाव पण मतदारांच्या यादीतून बाहेर फेकले जाते. अशावेळी निवडणुकीपूर्वी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तुमचे नाव (Voter ID Card) तपासू शकता. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीवेळी तुमची धांदल उडणार नाही.

असे तपासा तुमचे नाव

सर्वात अगोदर तुमचा फोन वा लॅपटॉपच्या मदतीने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जा. याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. Search by Details, Search by EPIC and Search by Mobile या आधारे तुम्ही नाव तपासू शकता.

हे सुद्धा वाचा

पहिला पर्याय

जर तुम्ही Search by Details हा पर्याय निवडत असाल तर तुमचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ यांची माहिती नोंद करा. त्यानंतर कॅप्चा कोड नोंदवा. त्यानंतर तुमचे नाव असेल, तर या यादीत ते समोर दिसेल.

दुसरा पर्याय

जर तुम्ही ‘EPIC सर्च ऑप्शन टॅप कराल. तर तुम्हाला भाषा निवडावी लागेल. तुमचा EPIC क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर सर्चवर क्लिक करावे लागेल. त्याआधारे तुमचे नाव, व्होटर आयडी क्रमांक दिसेल.

तिसरा प्रकार

जर तुम्ही Search by Mobile हा पर्याय वापरुन तुमचे नाव शोधाल. तर तुम्हाला राज्य आणि भाषा निवडावी लागेल. त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. हा क्रमांक मतदान ओळखपत्रासह तुम्ही नोंदवलेला असेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सर्च बटणवर क्लिक करा. या तीन प्रकारे तुम्ही लोकसभा निवडणूक 2024 मधील मतदान यादीत तुमचे नाव तपासू शकता.