AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन् चाकणकरांचा धमकीचा फोन आला; भोंदूबाबा खरातबाबत नवे धक्कादायक खुलासे, त्या पत्रकाराच्या दाव्याने खळबळ!

नाशिक येथील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक खरातवर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा केल्यानंतर त्याला अटक केली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांचा खरात यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Mar 19, 2026 | 6:22 PM
Share
नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.

1 / 5
चाकणकरांनी मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणाऱ्या आरोपांबाबत माहित नसल्याचं म्हंटल आहे. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात,  थेट नाव न घेता "कॅप्टन भोंदूबाबा" या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते.

2 / 5
त्यावेळी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केलाय.

3 / 5
महिला आयोगाकडून 'स्यु-मोटो' गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

4 / 5
खरातचा दावा आहे की, ते मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत आणि २२ वर्षे त्यांनी अनेक देशांची सफर केली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा दावा केला आणि ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचे सांगितले. ते स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचे तज्ज्ञ म्हणवत होते. खरात 'शिवनिका ट्रस्ट'चे प्रमुख आहेत आणि ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होते. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

5 / 5
Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान