Video : आसाममध्ये महापुराने अख्खं रेल्वे स्टेशन गिळलं! एक्स्प्रेस रुळांवरुन घसरली, थरकाप उडवणारी घटना

Video : आसाममध्ये महापुराने अख्खं रेल्वे स्टेशन गिळलं! एक्स्प्रेस रुळांवरुन घसरली, थरकाप उडवणारी घटना
महापुराचा कहर
Image Credit source: Twitter Video Snap

assam flood 2022 : एक्स्प्रेसचं इंजिनदेखील पुराच्या पाण्यानं वेढलं गेलं होतं. डोंगरावरुन दरडीचा भाग खोला कोसळत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय

सिद्धेश सावंत

|

May 17, 2022 | 9:00 AM

आसाम : आसाममध्ये मुसळधार (Assam Flood 2022) पावसानं कहर केलाय. आसाममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत जालंय. अनेक गावांना पुरानं वेढा घातलाय. तर असंख्य कुटुंबांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. महापुरामुळे (Assam News) आसामचं मोठं नुकसान केलंय. या महापुरातील महाप्रलयकारी दृश्य (Assam Flood Video) समोर आली आहे. आसाममधील पुराचा फकटा रेल्वेलाही बसलाय. रेल्वे पुराच्या पाण्यात एखाद्या बोटीसारखी हेलखावे खात असल्याचं दिसून आलंय. रेल्वे रुळावरुन खाली ही ट्रेन घसरत असल्याची थरकाप उडवणारी दृश्यं समोर आली आहेत. सुदैवानं यावेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरड कोसळून रेल्वे रुळांवर आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा आणि डोंगरावरुन कोसळणारं पाणी रेल्वे रुळांवर आलं होतं. याता थेट फटका रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला बसलाय.

आसाममध्ये न्यू हाफलोंग स्टेशनवर ही घटना घडली. भूस्खलनामुळे रेल्वे स्थानकाला पाण्यानं व्यापून टाकलं होतं. पुराचं पाणी इतकं वाढलं की एक्स्प्रेसची सगळी चाकं पाण्याखाली गेली होती. पाण्याचा प्रवाह प्रचंड शक्तिशाली होता. ज्यामुळे ही ट्रेन रुळांवरुन घसरली.

पाहा व्हिडीओ :

 

एक्स्प्रेसचं इंजिनदेखील पुराच्या पाण्यानं वेढलं गेलं होतं. डोंगरावरुन दरडीचा भाग खोला कोसळत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. दूरवर कुठेच रेल्वे रुळ दिसून येत नाहीएत. रेल्वे स्थानकाच्या फूट ओव्हर ब्रीजवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.

हे सुद्धा वाचा

थोडक्यात पण महत्त्वाचं :

  1. 20 जिल्ह्यांत दोन लाख लोकांना महापुराचा फटका
  2. 29 रेल्वे गाड्या रद्द
  3. हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरु
  4. 57 हजार लोकांना स्थलांतरीत करण्याची वेळ

आसाममध्ये आलेल्या पुरानंतर प्रशासनही सतर्क झालंय. बचावकार्यहेर जोरात सुरु आहे. सध्या दीमा सराव या आसाममधील जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. धुव्वाधार पावसामुळे अनेकांचं मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें