दिल्लीवर महासंकट, विमानसेवा तडकाफडकी रद्द, रेड अलर्ट जारी

Delhi Alert News : दिल्लीतील नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. विमान सेवा पण तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. इतकेच नाही तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दक्षिण-पश्चिम राजस्थानसह उत्तर आणि मध्य भारतातील जनतेला काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्लीवर महासंकट, विमानसेवा तडकाफडकी रद्द, रेड अलर्ट जारी
दिल्लीवर महासंकट
Image Credit source: गुगल
| Updated on: May 02, 2025 | 9:34 AM

दिल्ली आणि NCR मध्ये शुक्रवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. काही भागात गारपीट झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळांमध्ये मोठा दिलासा मिळाला. घामाच्या धारा थांबल्या. अचानक पावसाने दणका दिल्याने कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांना पावसाने चकवा दिल्याने अनेकांना ओल्या कपड्यानिशी कार्यालय गाठावं लागलं. या अचानक पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची त्रेधात्रिपीट उडाली.

बदललेल्या पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली. तर 100 हून अधिक विमान सेवेला उशीर होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ( IMD) राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्यानुसार पुढील दोन तासांत दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात 70 ते 80 किमी प्रति तास वेगाने वारा वाहणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यातच मुसळधार पाऊस हजेरी लावले अशी शक्यता आहे.


पालक हवामान केंद्राने 74 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा दावा केला आहे. तर काही दिवसांनी उष्णतेमुळे लाही लाही होत असलेल्या दिल्लीकरांना आणि उत्तर भारतामधील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी येण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर या काळात प्रवास टाळण्याच्या सूचना हवामान खात्याने नागरिकांना दिल्या आहेत.

दिल्लीकरांना पावसाचा दणका

पावसामुळे चौघांचा मृत्यू

पाऊस आणि जोरदार वादळामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे समोर आले आहे. द्वारकामधील एका गावात घर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जोरदार वाऱ्यामुळे शेतात बांधलेल्या घरावर झाड कोसळल्याने ही घटना घडली. आई आणि तिच्या 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत महिलेचा पती किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.

विमानसेवा प्रभावित

वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली. तर 100 हून अधिक विमान सेवेला उशीर होणार आहे. पुढील दोन दिवस हे पावसाचे असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवस विमानसेवा प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने ( IMD) राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तरेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना कडक उन्हाळ्यात गारवा मिळाला आहे.