वजन 9.5 टन, संपूर्ण कांस्य…असा आहे नव्या संसदेवरील अशोक स्तंभ, एकमेवाद्वितीय स्तंभाची निर्मितीही वेगळी

आत्तापर्यंत देशात तायर करण्यात आलेला सर्वात भव्य आणि विशाल अशोक स्तंभ अशी त्याची ओळख असणार आहे. या राष्ट्रीय प्रतिकात काय वेगळेपण आहे, इतर कोणत्याही अशोक स्तंभापेक्षा हे वेगळे का आहे, हे जाणून घेऊयात.

वजन 9.5 टन, संपूर्ण कांस्य...असा आहे नव्या संसदेवरील अशोक स्तंभ, एकमेवाद्वितीय स्तंभाची निर्मितीही वेगळी
विरोधकांना प्रत्युत्तर
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 7:22 PM

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी आज नव्या संसदेच्या निर्माणकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संसद भवनाच्या (Sansand Bhavan)छतावर लावण्यात आलेल्या अशोक स्तंभाचेही (Ashok Stambh) उद्घाटन केले. मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर या खास आणि भव्य अशोक स्तंभाची चर्चा सध्या सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उद्घाटनाच्या काही फोटोंमध्ये स्तंभ किती मोठा आहे, याची क्लपना आपल्याला येऊ शकते. मात्र त्याचे वेगळेपण एकमेकाद्वितीय आहे. देशात अशा प्रकारच्या मटेरियलने तयार केलेला दुसरा कोणताही अशोक स्तंभ नाही. हे त्याचे वेगळेपण आहे. आत्तापर्यंत देशात तायर करण्यात आलेला सर्वात भव्य आणि विशाल अशोक स्तंभ अशी त्याची ओळख असणार आहे. या राष्ट्रीय प्रतिकात काय वेगळेपण आहे, इतर कोणत्याही अशोक स्तंभापेक्षा हे वेगळे का आहे, हे जाणून घेऊयात.

संसदेवरील अशोक स्तंभाची वैशिष्ठ्य

1. हा राष्ट्रीय स्तंभ संसद भवनाच्या छतावर स्थित आहे. हे त्याचे पहिले वेगळेपण आहे. त्याचबरोबर त्याचे वजन 9.5 टन आहे, यावरुन त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येऊ शकेल.

2. याच्या विशालतेचा विचार केला तर याची उंची 6.5 मीटर इतकी मोठी आहे. इतक्या मोठ्या अशोक स्तंभाला टेकू देण्यासाठी त्याच्या आजूबाजूला 6500 किलो स्टीलची रचना उभी करण्यात आली आहे. यामुळे अशोक स्तंभ आपल्या जागी स्थिर राहणार आहे.

3. शुद्ध कांस्य वापरुन हा स्तंभ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यावर झालेला खर्चही मोठा असल्याचे मानण्यात येते आहे. हा अशोक स्तंभ तयार करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपल्बध झालेली नाही.

कशी झाली निर्मिती?

या अशोक स्तंभाची भव्यता तर आता आपल्या लक्षात आली असेलच. मात्र हा स्तंभ भव्य तयार करण्यासाठी त्यानागे खूप कष्टही घेण्यात आले आहेत. सलग आठ टप्प्यांत या स्तंभाची निर्मिती करण्यात आली असे सांगण्यात आले आहे. यात चिकन मातीची प्रतिकृती तयार करण्यापासून त्याचे कॉम्प्युटरवर ग्राफिक्स तयार करणे आणि कांस्याची प्रतिकृती निर्माण करुन त्याचे पॉलिशिंग करणे या सगळ्यांचा समावेश आहे. याचे डिझाईन, क्राफ्टिंग आणि कास्टिंगसाठी सुमारे 100 कलाकारांनी काम केले आणि या स्तंभाच्या निर्मितीसाठी ६ महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात आले आहे.

कशी होती प्रक्रिया?

या अशोक स्तंभाचे पहिले ग्राफिक्स स्केच तयार करण्यात आले. त्यानंतर चिकन मातीच्या सहाय्याने तशी प्रतिकृती तयार करण्यात आली. मग या ग्राफिक्स मॉडेलला परवानगी मिळाल्यानंतर एफपीआर मॉडेलवर तयार करण्यात आले. सुरुवातीला याचे क्ले मॉडेल तयार केल्यानंतर मग कारागिरांनी त्याची कांस्य मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेत मेणाचा वापरही करण्यात आला. सुरुवातीला मेणाच्या सहाय्याने आणि मग मेण पाघळून कांस्यांचा वापर करत ही मूर्ती तयार करण्यात आली. त्यानंतर पॉलिश करुन त्याला नवा लूक देण्यात आला. याच्यावर कोणतेही रंग वापरण्यात आलेले नाहीत. यावर फक्त पॉलिश करण्यात आले आहे.

ही प्रतिकृती उभारणेही खास आव्हान होते

हा अशोक स्तंभ तयार करण्यात आल्यानंतर त्याची स्थापना करणे हेही मोठे आव्हान होते. जमिनीपासून 32 मीटर उंचीवर याची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी खास क्रेनचा वगैरे वापर करण्यात आला. खास चेन व्यवस्था आणि लोखंडाच्या लेडर्सच्या मदतीने याची स्थापना करण्यात आली. आज पंतप्रधानांनी याचे उद्घाटन केले.