हा प्रश्न विचारताच ईशा देओल हिला बसला मोठा धक्का, वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच..
अभिनेत्री ईशा देओल नुकताच स्पॉट झाली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल सतत आई हेमा मालिनी यांच्यासोबत होती.

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मात्र धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कमालीची गुप्तता पाळण्यात आली. धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शनही चाहत्यांना मिळाले नाही. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 3 प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. देओल कुटुंबाकडून आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी किंवा ईशा देओल हे पोहोचले नव्हते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी दिल्ली आणि मथूरेत प्रार्थना सभा घेतली. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये एक युग गाजवले आहे. धर्मेंद्र यांचा चाहतावर्ग जबरदस्त आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. काही दिवस धर्मेंद्र यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना घरी हालवण्यात आले. धर्मेंद्र यांच्या मुंबईतील प्रार्थना सभेत अनेक बॉलिवूड कलाकार समजले होते. मोठी गर्दी यावेळी झाली होती.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ईशा देओल विमानतळावर स्पॉट झाली. दिल्लीतील प्रार्थना सभेत आई हेमा मालिनी यांना सांभाळताना ईशा देओल दिसली. हेच नाही तर तिला यावेळी स्वत:चे अश्रू रोखणेही कठीण झाले होते. ईशा देओल वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्पॉट झाली. मुंबई विमानतळावर ईशा स्पॉट झाली. यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देतानाही ईशा दिसली.
ईशा देओल हिला यावेळी पापाराझी यांनी विचारले की, कसे आहात? मात्र, हा प्रश्न ऐकून तिला धक्का बसला. तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. हा काय प्रश्न म्हणत तिने हात जोडले. फोटोसाठी काही सेकंद थांबली आणि ईशा देओल निघून गेली. ईशाचे देओल ही धर्मेंद्र यांच्या आजारपणात जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवत होती. हेच नाही तर वडिलांच्या निधनानंतर ती सतत हेमा मालिनी यांच्यासोबत होती.
View this post on Instagram
ईशा देओल हिने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत खास व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये ती सावत्र आई प्रकाश काैर हिलाही विसरली नाही. धर्मेंद्र यांचे पूर्ण आयुष्य दाखवताना तिने प्रकाश काैर यांच्यासोबतचेही फोटो व्हिडीओमध्ये दाखवली. धर्मेंद्र यांचा संपूर्ण प्रवास दाखवण्याचा तिने यावेळी प्रयत्न केला.
