‘तुम्ही सुद्धा लग्न केले नाही?’ भरसभेत अखेर शुभेंदु अधिकारी यांनी काय दिलं उत्तर? कोणते ते सीक्रेट?

West Bengal BJP CM Shubhendu Adhikari: शुभेंदु अधिकारी यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्या खासगी जीवनाची पण चर्चा होते. शुभेंदु अधिकारी यांनी लग्न का केले नाही, असा सवाल त्यांना करण्यात आला, काय दिले त्यांनी उत्तर?

तुम्ही सुद्धा लग्न केले नाही? भरसभेत अखेर शुभेंदु अधिकारी यांनी काय दिलं उत्तर? कोणते ते सीक्रेट?
शुभेंदु अधिकारी यांनी का केले नाही लग्न
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 09, 2026 | 12:43 PM

West Bengal BJP CM Shubhendu Adhikari Marriage: शुभेंदु अधिकारी हे भाजपचे पश्चिम बंगालमधील पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्या खासगी जीवनाची नेहमी चर्चा होते. शुभेंदु अधिकारी हे सुद्धा अविवाहित आहेत. त्यांनी लग्न का केले नाही याविषयी सतत प्रश्न विचारल्या जातो. त्यावर त्यांनी एका सभेत उत्तर दिले होते.

काय दिले होते उत्तर?

55 वर्षांचे शुभेंदु अधिकारी यांनी आतापर्यंत लग्न का केले नाही असा सवाल विचारल्या जातो. डिसेंबर 2020 मध्ये त्यांना एका सभेदरम्यान हाच सवाल विचारल्या गेला. आजतक बांग्लाच्या एका वृत्तानुसार, हल्दिया येथील रॅलीत ते उपस्थित होते. त्यावेळी शुभेंदु यांनी उत्तर दिले. “मला अनेक लोक विचारतात शुभेंदु तू अजून अविवाहित का आहेस? तुझा भाऊ तर विवाहित आहे. त्यावर मी म्हणतो की, आजच्या राजकीय नेत्यांच्या नजरेतून पाहिले तर शुभेंदु याचे कुटुंब काही लहानसहान नाही. पाच वा दहा सदस्यांचे नाही. शुभेंदु यांचे कुटुंब बंगाली कुटुंब आहे. कुटुंबासाठी सर्व काही अर्पण करावे लागते. हेच तर माझे आदर्श सतीश सामंता आणि सुशील धारा हेच सांगत. मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अविवाहित राहिलो.”

लग्न न केल्याने वडील नाराज

शुभेंदु अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी हे त्यांच्या लग्न न करण्याच्या निर्णयाने नाराज झाले होते. त्यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला. मला जेव्हा ही गोष्ट कळाली, तेव्हा मी त्याला फटकारले. पण नंतर मलाच वाईट वाटले. त्यानंतर मी त्याला काहीच म्हटलं नाही. त्याला मारलं नाही. तर याविषयावरून कधी मग त्याला बोललो नाही. ही प्रतिष्ठा, यश जाईल कुठं, पैसे जाईल कुठं? मुलं असतील तर त्याचं लग्न होईल, त्याचे कुटुंब असेल हा विचार करणं स्वाभाविक आहे, असे शिशिर अधिकारी म्हणाले.

टीएमसी सोडून शुभेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी लग्न न करण्याचे कारण सांगितले. 1987 मध्ये विद्यार्थी संघटनेशी जोडल्या गेलो. त्यानंतर पूर्णपणे या राजकीय जीवनात मिसळून गेलो. तीन स्वातंत्र्य सैनिक सतीश सामंतो, सुशील धारा, अजय मुखर्जी हे माझे आदर्श आहेत. या तिघांनीही लग्न केले नाही. मी या तिघांना फॉलो करतो. मग मी सुद्धा लग्न न करता काम करण्याचे ठरवले. असे अधिकारी यांनी सागितले.

Follow Us