राजकीय समीकरण बदलणार? बडा नेता भाजपमध्ये जाणार? महत्त्वाची अपडेट आली समोर
पश्चिम बंगालमधील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

पश्चिम बंगालच्या मर्शिदाबादमधील हूमायूं कबीर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कबीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना मोठा धक्का बसण्याची चर्चा आहे. यादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अधीर चौधरी यांनी चर्चा फेटाळून लावली आहे. जेव्हा हुमायू कबीर हे स्वत:हून भाजप प्रवेशाविषयी बोलतील, तेव्हाच मान्य करेल, असे त्यांनी सांगितले आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, ‘ते स्वत: भाजप प्रवेशावर बोलतील, तेव्हाच मान्य करेल. खरंतर मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला ही बाब चकीत करणारी वाटत आहे’. हुमायू कबीर हे सध्या आम जनता उन्नयन पार्टीत सक्रिय आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी भाजप नेत्यांनी संपर्क केल्याचा चर्चा आहे. मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये एका कार्यक्रमात कबीर यांनी म्हटलं होतं की, या पोटनिवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकला आणि विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही. मी आणि माजा मुलगा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याजवल जाऊ. हुमायू कबीर हे आधी तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत होते. रेजीनगर पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांनी मुलगा गुलाम नबी आजाद यांना उमेदवारी दिली आहे.
अधीर रंजन चौधरी काय म्हणाले?
हुमायू कबीर हे भाजप प्रवेशावरील चर्चेवर अधीर रंजन चौधरी यांनी भाष्य केलं. अधीर रंजन चौधरी यांनी पुढे म्हटलं की, हुमायू कबीर हे भाजप प्रवेश करण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. जोपर्यंत हूमायू कबीर हे काही बोलणार नाही. तोपर्यंत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही विश्वास ठेवणार नाही’. तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील दोन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षातील नेते सज्ज झाले आहेत. या निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.