AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू दुकानदारांकडूनच बिर्याणी खा…; ऐन नवरात्रीत कुणी काढला अजब फतवा?

हिंदू दुकानदारांकडूनच बिर्याणी खावा,अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

हिंदू दुकानदारांकडूनच बिर्याणी खा...; ऐन नवरात्रीत कुणी काढला अजब फतवा?
biryani news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 13, 2026 | 1:43 PM
Share

देशभरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीच्या दुर्गा पूजादरम्यान हिंदू जागरण मंचाच्या पोस्टरने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मटण, बिर्याणीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडून खरेदी करण्याचं आवाहन हिंदू जागरण मंचाने केलं आहे. बिर्याणी फक्त हिंदू दुकानदारांकडून खावा, अशा आशयाचं पोस्टर लावण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर मंत्री शंकर घोष यांच्या घराच्या समोर लावले आहेत.

सिलिगुडीच्या भारतनगरमध्ये तरुण तीर्थ क्लब द्वारे दुर्गा पूजा मैदानाच्या समोर मंत्री शंकर घोष यांचं घर आहे. त्यांच्या घरासमोरील मैदानात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. एका पोस्टरवर लिहिलं आहे की, ‘हिंदू दुकानदारांकडून मटण खरेदी करावे’. दुसर्‍या पोस्टरवर लिहिलं की, बिर्याणी खाण्यावर कोणतीही बंदी नाही. परंतु ही बिर्याणी हिंदू दुकानात खरेदी करावी, या पोस्टरमुळे लोकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. लोक रस्त्यावर थांबून पोस्टर वाचत आहेत. या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे.

सिलीगुडीचे माजी महापौरांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. हिंदू जागरण मंचचे प्रतिनिधी अभिषेक दास यांनी म्हटलं की, आम्ही स्वत: पोस्टर्स लावले आहेत. ही गोष्ट फक्त भारतनगरची नाही. तर संपूर्ण शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमधून हिंदू जागरण मंचाला हिंदू एकतेचा संदेश द्यायचा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.  या पोस्टरवर मंत्री शंकर घोष म्हणाले, मला माहिती नाही की, हे पोस्टर कोणी लावले आहेत. आता ज्याने पोस्टर लावले आहेत,तेच लोक याविषयी सांगू शकतात’. तर माजी महापौर अशोक भट्टाचार्य यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. हा प्रोपागंडा आहे. आरएसएस धर्माच्या नावावर द्वेष पेरत आहे. भाजपनेच हे पोस्टर लावल्याचा आरोप त्यांनी केला.  त्यांनी पुढे म्हटलं की, कोण काय खातं, कोण कुठून खरेदी करतात, कोणाला कुठून खरेदी करायचं नाही,  मग तो बंगाली असो, हिंदू, मुस्लि, बिहारी  किंवा मारवडी…प्रत्येक व्यक्तीला हे ठरवण्याची संधी द्यावी. आम्ही असा प्रपोगंडा कधी पाहिला नाही. आम्ही ज्याचा सामना करत आहोत, त्यामागे भाजप आहे’.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?