What India Thinks Today : आता लागणार अनवॉन्टेड कॉल्सला चाप; अश्विनी वैष्णव यांची महत्त्वपूर्ण माहिती

| Updated on: Jun 18, 2022 | 5:23 PM

भारतातील नंबर वन टीव्ही नेटवर्क TV9 च्या वतीने ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संवाद साधला.

What India Thinks Today : आता लागणार अनवॉन्टेड कॉल्सला चाप; अश्विनी वैष्णव यांची महत्त्वपूर्ण माहिती
Follow us on

नवी दिल्ली : भारतातील नंबर वन टीव्ही नेटवर्क TV9 च्या वतीने ग्लोबल समिटचे (Global Summit) (What India Thinks Today) आयोजन करण्यात आले आहे. या समिटचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी , अनवॉन्टेड कॉल्सबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अनेक व्यक्ती अनवॉन्टेड कॉल्समुळे परेशान असतात. कधीकधी या कॉल्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. असे कॉल्स तुम्हाला कुठेही येऊ शकतात. तुम्ही ऑफीसमध्ये असाल, मिटिंगमध्ये असाल किंवा अन्य काही कामात असाल तीथे असे कॉल येतात. यामुळे कामात व्यत्यय येतो. दरम्यान याबाबत जेव्हा अश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात वैष्णव नेमके काय म्हणाले आहेत ते.

 

हे सुद्धा वाचा

लवकरच नवी नियमावली

अश्विनी वैष्णव यांना अनवॉन्टेड कॉल्सबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, लवकरच ग्राहकांची अशा अनवॉन्टेड कॉल्सपासून मुक्ततात होईल. लवकरच त्यासंदर्भात आम्ही नियमावली जाहीर करणार आहोत. सरकारचे त्यावर काम सुरू आहे. नवी नियमावली लागू झाल्यानंतर असे कॉल्स करणाऱ्यांवर बंधने येतील. त्यामुळे या सर्व प्रकारातून ग्राहकांना दिलासा मिळाले. अनवॉन्टेड कॉल्स म्हणजे असे कॉल्स की जे तुम्हाला एखादे प्रोडक्ट विकण्याच्या उद्देशाने केले जातात. किंवा तुम्हाला एखादी सेवा घेण्याबाबत सुचवण्यासाठी केले जातात. तुम्हाला ते प्रोडक्ट किंवा सेवा घ्यायची नसेल तरी तुम्हाला असे कॉल वारंवार येतच असतात. यामुळे अनेकदा कामात व्यत्यय येतो. आता सरकार लवकरच अशा कॉल्ससंदर्भात नवी नियमावली लागू करणार आहे.

DND चा देखील वापर करू शकता

अनवॉन्टेड कॉल्स बंद करण्यासाठी यापूर्वी देखील काही नियम बनवण्यात आले आहेत. तुम्ही जर अशा कॉल्समुळे परेशान असाल तर तुम्ही DND ‘डू नॉट डिस्टर्ब’ सेवेचा देखील लाभ घेऊ शकता. याद्वारे तुम्ही विविध कंपन्यांकडून येणारे टेली मार्केटिंग कॉल्स पूर्णपणे बंद करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या कंपनीचे सीम वापरत आहात, त्या कंपनीकडून एक विशिष्ट नंबर देण्यात येतो. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या सीमवर डीएनडी सेवा सुरू करू शकता. त्यामुळे तुमची अशा कॉल्सपासून सुटका होईल.