
Explainer : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारतीय तांदुळामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. भारताने अमेरिकेच्या बाजारात त्यांचा तांदुळ डम्प करु नये असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी भारतीय तांदुळावर टॅरिफ लावून या समस्येतून मार्ग काढला जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतू भारतीय तांदुळावर टॅरिफची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना हे माहिती आहे का अमेरिकेतील भारतीय तांदुळाशिवाय राहू शकतील काय ? अमेरिकेत बिर्याणीसाठी भारतीय बासमती तांदुळाचा आधार घेतात. तसेच अमेरिकेतील तांदुळाच्या जाती भारतीय बासमतीची जागा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतीय तांदुळाच्या सुंगधाशिवाय बिर्याणीची डीश कशी सजणार असा सवाल केला जात आहे. भारताला त्याच्या तांदुळाचा का अभिमान आहे ? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या धमकीनंकर इंडियन राईस एक्स्पोर्ट्स फेडरेशनने ( Indian Rice Exporters Federation ) या संदर्भात विस्तृत स्पष्टीकरण देखील जारी केले आहे. ज्यात म्हटले आहे की भारताच्या सोबत अमेरिकेच्या तांदळाचा व्यापार...