Tejas Fighter Jet Crash : ही गोष्ट फक्त तेजसच्या क्रॅशची नाही, किती खतरनाक असतो नेगेटिव G टर्न? सलाम त्या शूर विंग कमांडरला

Tejas Fighter Jet Crash : लूप, रोल्स,हाय-स्पीड टर्न्स सुरु केल्या. प्रेक्षक हे हवाई कौशल्य पाहून मंत्रमुग्ध झाले. एक लूप नंतर तेजसने नेगेटिव G टर्नचा प्रयत्न केला. व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसतय तेजस वरुन खाली येतय. ते रिकव्हरच करु शकलं नाही.

Tejas Fighter Jet Crash : ही गोष्ट फक्त तेजसच्या क्रॅशची नाही, किती खतरनाक असतो नेगेटिव G टर्न? सलाम त्या शूर विंग कमांडरला
Tejas
Image Credit source: Vayu Air Review
Updated on: Nov 22, 2025 | 2:46 PM

आकाशात तेजसची गर्जना आणि जमिनीवर टाळ्यांच कडकडाट. काल दुपारी दुबई एअर शो मध्ये असच वातावरण होतं. जगातील सर्वात मोठ्या हवाई शक्ती प्रदर्शनात भारताचा गौरव, अभिमान तेजस आपली चपळता दाखवण्यासाठी उतरलं होतं. पण पुढच्याच क्षणी एक भयानक दुर्घटनेने सगळेच स्तब्ध झाले. तेजसने एक नेगेटिव G टर्न मारला. त्यातून तेजस शेवटपर्यंत सावरुच शकलं नाही. थेट जमिनीवर कोसळून तेजस आगीच्या गोळ्यामध्ये बदललं. यात विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. मागच्या 10 वर्षात तेजस लढाऊ विमानाला झालेला हा दुसरा अपघात आहे. या अपघाताने तेजसच्या शानदार सुरक्षा रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. ही गोष्ट फक्त एका क्रॅशची नाहीय, तर तेजसचं यश, धोकादायक एरोबॅटिक मॅन्यूवर आणि धाडसी पायलटचं बलिदान याची आहे.

दुबई एअर शो दर दोन वर्षांनी होतो. एविशन विश्वातील हा ऑस्कर मानला जातो. 21 नोव्हेंबर 2025 या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. अल मकतून इंटरनॅशनल एअरपोर्टवर हजारो लोक जमलेले. दुपारी 2.15 च्या सुमारास सगळ्यांच्या नजरा तेजसकडे होत्या. तेजस 2016 पासून एअर फोर्सचा भाग आहे. हे विमान तामिळनाडूच्या सुलूर एअर बेसवरील 45 व्या स्क्वाड्रनच होतं. तेजसने आपल्या चित्तथरारक हवाई कसरती सादर करायला सुरुवात केली. तेजस वेगाने जमिनीवर येऊन आपटलं. वैमानिकाला इजेक्ट म्हणजे पॅराशूटद्वारे बाहेर निघण्याचा वेळच मिळाला नाही.

G-LOC म्हणजे काय?

फायटर जेट्समध्ये हा नेगेटिव G टर्न काय असतो?. G फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. उड्डाणादरम्यान या G फोर्सचा भार वैमानिक आणि विमान दोघांवर असतो. नॉर्मल उड्डाणात 1 G असतो. पॉझिटिव्ह G मध्ये रक्त पायाच्या दिशेने वाहतं. त्यामुळे ब्लॅकआऊट होऊ शकतो. पण नेगेटिव G मध्ये उलटं असतं. जेट जमिनीच्या दिशेने वेगाने जातं किंवा उलटं होतं. यावेळी रक्त मेंदूच्या दिशेने वाहतं. याने रेड आऊट G-LOC होऊ शकतं. माणूस -2 ते -3G सहन करु शकतो. पण G-LOC म्हणजे ग्रेविटी इंड्यूस्ड लॉस ऑफ कॉन्शियसनेस. हे त्यावेळी होतं, जेव्हा एखाद्या व्यक्ती जास्त गुरुत्वाकर्षण बलामुळे बेशुद्ध होतो. डोक्याला रक्तप्रवाह कमी होतो. फायटर पायलटसाठी हा एक गंभीर धोका आहे.

उंची कमी असेल तर काही सेकंदच मिळतात

दुबई एअर शो मध्ये नेगेटिव G टन तेजसची खासियत होती. या जेटची डिजाइनच अशी आहे की लूप नंतर हे विमान वेगाने खाली येतं. मग रिकवर होतं. पण उंची कमी असेल तर काही सेकंदच मिळतात. एक्सपर्ट्सनुसार दुर्घटनेच्यावेळी उंची कमी होती. लूप संपताच नेगेटिव G फेजमध्ये जेट स्टेबल नाही झालं. ब्लॅक बॉक्स डाटाच्या रिकव्हरीमधूनच अपघाताचं नेमकं कारण समजेल.