AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What is Smoke Candles : संसदेत स्मोक कँडल्सचा वापर, काय आहे स्मोक कँडल्स?; धूर होताच सर्व पळाले

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेत धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी एक सव्वा एकच्या दरम्यान दोन जणांनी संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यानंतर एकच गोधंळ उडाला. या दोघांना पकडण्यासाठी खासदार पुढे सरसावले. सुरक्षारक्षकही धावले. यावेळी एकाने स्मोक कँडल फोडला. त्यानंतर दुसऱ्यानेही स्मोक कँडल फोडला. त्यामुळे एकच धूर झाला. अचानक पिवळा-लाल धूर निघाल्याने सर्वच घाबरले.

What is Smoke Candles : संसदेत स्मोक कँडल्सचा वापर, काय आहे स्मोक कँडल्स?; धूर होताच सर्व पळाले
Smoke BombImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 13, 2023 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली ! 13 डिसेंबर 2023 : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मोठी धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरुणांनी संसदेचं कामकाज सुरू असताना प्रवेश केला. सभागृहात येऊन या दोघांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी पकडापकडी सुरू झाली. सुरक्षारक्षक आणि खासदारांनी या दोघांना पकडण्यासाठी पळपळ केली. या गोंधळामुळे संसदेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं. या दोघांनी नंतर संसदेबाहेर स्मोक कँडल फोडण्यात आली. या स्मोक कँडलमधून पिवळा धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांनीही पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

नीलम कौर सिंग आणि अमोल शिंदे असं या दोघांचं नाव आहे. नीलम ही हरियाणाच्या हिस्सार येथील रहिवाशी आहे. तर अमोल शिंदे हा लातूरचा रहिवाशी आहे. हे दोघेही संसदेत शिरले. संसदेत त्यांनी प्रेक्षक गॅलरीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सभागृहात उड्या मारताच त्यांनी स्मोक कँडल फोडले. त्यामुळे एकच धूर निघाला. प्रचंड धूर झाला. पांढरा, लाल आणि पिवळा धूर झाल्याने सर्वच खासदार घाबरले. काही खासदार सभागृहाच्या बाहेर पळाले. तर काही खासदारांनी या दोघांना पकडण्यासाठी धावपळ सुरू केली. सुरक्षा रक्षकांनीही या दोघांना पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा केला.

दोघे अटकेत

त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. दोघांनाही संसदेच्या बाहेर आणण्यात आलं. तेव्हाही या दोघांनी स्मोक कँडल फोडले आणि पुन्हा एकदा संसदेच्या बाहेर पिवळा धूर झाला. त्यामुळे सर्वच घाबरले. दोघांनीही हा गॅस सोडला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना आणि नाकाला झिणझिण्या आल्या. त्यामुळे खासदारांच्या पोटात गोळाच आला. या दोघांना पकडून पार्लियामेंट्री पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

काय आहे स्मोक कँडल?

स्मोक कँडल हा एक प्रकारचा फटाका आहे. हा कँडल फोडताच प्रचंड धूर होतो. दिवाळीत किंवा एखाद्या पार्टीच्यावेळी हा कँडल फोडला जातो. नेव्हीवाले संकटाच्यावेळी सिग्नल देण्यासाठी हा स्मोक कँडल फोडत असतात. गेल्या काही काळापासून भारतात हा स्मोक कँडल प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. आज त्याचा वापर संसदेत निदर्शने करण्यासाठी करण्यात आला आहे.

इतिहास काय?

जापानमध्ये सर्वात आधी स्मोक कँड बनवण्यात आला होता. मात्र आधुनिक काळाबाबत सांगायचं म्हणजे 1848 मध्ये ब्रिटिश इन्व्हेंटर रॉबर्ट येल यांनी स्मोक कँडलचा शोध लावला. त्यात चीनी पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यात काही बदल करून काही गोष्टी टाकण्यात आला. त्यामुळे स्मोक कँडलचा प्रभाव अधिक काळ राहतो.

सध्याच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचे स्मोक कँडल दिसतात. त्यातून रंगीत धूरही निघतो. आज संसदेत जो स्मोक कँडल वापरला गेला. त्यातून पिवळा आणि लाल रंगाचा धूर निघाला. संसद भवनातून आंदोलकांना घेऊन जात असतानाच हा धूर स्पष्टपणे दिसला.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.