AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन राज्यात भाजपच्या मोठ्या विजयाचं काय आहे गुजरात कनेक्शन?

Gujrat connection in assembly election : तीन राज्यात भाजपला मिळालेल्या मोठ्या यशाचं क्रेडिट जरी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना दिलं जात असलं तरी देखील ते ग्राऊंड लेव्हलला उतरवण्यात गुजरातच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे. भाजपने कसा मिळवला विजय जाणून घ्या.

तीन राज्यात भाजपच्या मोठ्या विजयाचं काय आहे गुजरात कनेक्शन?
BJP
| Updated on: Dec 05, 2023 | 7:15 PM
Share

Assembly election Result : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजप बहुमताचं सरकार स्थापन करणार आहे. यामुळे एक्झिट पोल देखील फोल ठरले आहेत. या विजयानंतर संपूर्ण देशात भाजपने जल्लोष केला आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सगळेच पक्ष मंथन करत आहेत. विजयाने मोदींची जादू अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना याचे श्रेय देत आहे. पण या तीन राज्यातील विजयाशी गुजरातचे कनेक्शन आहे. गुजरातचे नेते दोन महिन्यांपासून त्यांना दिलेल्या राज्यांमध्ये तळ ठोकून होते.

दोन महिन्यांपासून सुरु होते काम

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून आलेल्या सुमारे दीडशे नेत्यांनी दोन महिन्यांपूर्वी तळ ठोकला होता. या नेत्यांनी ग्राऊंड लेव्हलला काम केले. रणनीती आखली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या काळात मध्य प्रदेश सरकारच्या कल्याणकारी योजनांचाही मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला.

गुजरातमधील भाजप नेत्यांची मेहनत

भाजप मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या नेत्यांमध्ये गुजरात संघटनेचे सरचिटणीस रत्नाकर, जितू वाघानी आदींचा समावेश आहे. तसेच राजस्थानची कमान गुजरातचे भाजप नेते नितीन पटेल यांच्याकडे देण्यात आली होती. राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे सहप्रभारी बनवण्यात आले. नितीन पटेल यांनी त्यांच्या टीमसोबत राजस्थानच्या प्रत्येक गावात जाऊन गुजरात मॉडेलवर काम केले.

भाजपसाठी राजस्थानचा विजय त्यामुळे सोपा झाला. आता गुजरातमध्ये नितीन पटेल यांचा दर्जा आणि पद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला अनपेक्षित विजय मिळाला आहे. या विजयामागे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांची रणनीती असली, तरी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या विजयाला जमिनीवर आणण्यात आणि कट्टर काँग्रेसजनांनाही भाजपशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.