Xerox Marathi Meaning : झेरॉक्सला मराठीमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही सांगता येणार
मराठी ही अतिशय प्राचीन अशी भाषा आहे, आपल्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र आजही अनेक असे शब्द आहेत, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं, असाच एक शब्द आहे तो म्हणजे झेरॉक्स.

आपली मराठी भाषा ही अतिशय प्राचीन आहे, काळाच्या ओघात भाषेचा विकास होत गेला, अनेक नवनवीन शब्द भाषेमध्ये जोडले गेले. मराठी भाषेचा जसजसा विकास होत गेला, तसतसे इतरही काही भाषेतीत शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत जोडले गेले. त्यांनाच आपण तद्भव आणि तत्सम शब्द असं देखील म्हणतो. उदहारण द्यायचं झालं तर टेबल हा शब्द इंग्रजी आहे, पण त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे अनेकांना माहितच नसतं मग अशावेळी होत काय तर तो शब्द सर्रासपणे जसाच्या तसा मराठी भाषेमध्ये वापरला जातो. असे अनेक इंग्रजी शब्द आहेत, ज्याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो? हे आपल्याला माहीत नसते, त्यामुळे मग आपण जो इंग्रजी शब्द जसच्या तसा मराठीमध्ये वापरतो.
काही शब्द तर आपल्या एवढे अंगवळणी पडतात, त्या इंग्रजी शब्दाची आपल्याला एवढी सवय झालेली असते की जर एखाद्या व्यक्तीने त्या शब्दाबद्दल एखादा शुद्ध मराठी शब्द वापरला तर तो नक्की काय म्हणतोय हे समजून घेताना आपला गोंधळ उडतो, उदहारण द्यायचं झालं तर क्रिकेटमध्ये बॅट असते. सर्वच जण त्याला बॅट असंच म्हणतात. मात्र त्याच्यासाठी मराठीमधील शब्द चेंडूफळी असा आहे, आता तुम्ही जर एखाद्या दुकानात गेले आणि दुकानदाराला म्हटलं की मला चेंडूफळी दे, तर त्या दुकानदाराचा नक्कीच गोंधळ उडेल, तुम्हाला नक्की काय पाहिजे हे त्याला समजणार नाही, पण तुम्ही दुकानात गेले आणि म्हणालात मला बॅट द्या तर तो लगेच तुम्हाला बॅट देईल.
असेच आणखी काही शब्द आहेत, ज्याचा मराठीमधील अर्थ आपल्याला माहिती नसतो, आता तुम्ही अनेकदा झेरॉक्स काढता, विविध महत्त्वाच्या कागदपत्रांचा झेरॉक्स काढला जातो, सरकारी कार्यालयात तुम्हाला जर ओळखीचा पुरावा द्यायाचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या ओरिजनल ओळखीच्या पुराव्याचा झेरॉक्स काढून तिथे सादर करावा लागतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की झेरॉक्सला मराठीमध्ये काय म्हणतात? अनेकांना माहिती नसेल, झेरॉक्सला मराठीमध्ये प्रतिमुद्रा असं म्हटलं जातं.
