भारतीय तरुणी गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च करतात ही एक गोष्ट, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये गुगलने एक नवी क्रांती केली आहे, आपल्याला कोणताही प्रश्न पडला तर आपण लगेच गुगलवर जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो, गेल्या वर्षभरात भारतीय तरुणींनी गुगलवर कोणत्या प्रश्नांचा शोध घेतला, काय सर्च केलं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय तरुणी गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च करतात ही एक गोष्ट, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 9:22 PM

आजच जग हे इंटरनेटचं जग आहे, गुगलने तर इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. सध्या 5 G मुळे तर इंटरनेटचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यातच टेलीकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे इंटरनेट देखील खूप स्वस्त झाले आहे, पूर्वी एक ते दोन जीबी डेटासाठी शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागायचे, मात्र आता त्याच दोनशे रुपयांमध्ये तुम्हाला महिनाभरासाठी अमर्याद डेटा उपलब्ध होत आहे. आपल्याला दिवसभरात अनेक प्रश्न पडत असतात, सर्वच प्रश्नांची उत्तर आपल्याला माहितीच असतील असं नाही तर तेव्हा आपण काय करतो, पटकन गुगलवर जातो, आपल्याला जो प्रश्न पडला आहे, तो गुगलवर सर्च करतो आणि त्याचं उत्तर मिळवतो. ही माध्यम क्षेत्रात झालेली मोठी क्रांती आहे.

तसेच आपल्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल खूप डीप माहिती हवी असेल तरी देखील आपण गुगलचा आधार घेतो, गुगलवर आपल्याला ज्या क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल त्याबद्दल अमर्याद माहिती उपलब्ध असते. गुगलवर कोणी काहीही सर्च करू शकतो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की गुगलवर सर्वाधिक वेळा काय सर्च केलं जातं असेल, आज आपण अशाच एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत, ते म्हणजे मुली गुगलवर सर्वाधिक वेळा काय सर्च करतात त्याबद्दल.

गुगल आणि अन्य काही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून दरवर्षी एक अहवाल सादर केला जातो, ज्यामध्ये गेल्या वर्षभरात गुगलवर सर्वाधिकवेळा काय सर्च करण्यात आलं, कोणत्या शब्दाचा शोध घेण्यात आला याची माहिती असते,  अशाच एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. महिला गुगलवर सर्वाधिक वेळा काय सर्च करतात याबाबत ही माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महिलांनी गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेळा मेकअप आणि त्याच्याशी संबंधित आलेले नवे ट्रेड सर्च केले आहेत. मेकअपचे नवीन नवीन प्रोडक्स त्याची उपयुक्तता आणि त्याचा वापर कसा करावा या संबंधि माहिती तसेच त्याचे फायदे तोटे या सारख्या गोष्टी देखील सर्च केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरला मनोरंजन क्षेत्राशी संबंधित माहिती महिलांनी गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केल्याचं समोर आलं आहे.