
बिहार विधानसभा निवडणूकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला आणि नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकारणातील काही जुन्या आठवणींना उजाळाही मिळत आहे. पाटण्यातील शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान सोशल मीडियावर एक जुना फोटो खूप शेअर होत आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळ्याच रुपात दिसत आहेत. त्यांचे असे रुप त्यांचा साधेपणा आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच वेळी दाखवत आहेत. हा फोटो 1995 च्या गुजरात येथील एका शपथविधी समारंभाचा आहे. जेव्हा केशुभाई पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या समारंभात लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन यांसारख्या हस्ती व्यासपीठासमोर खुर्च्यांवर बसली होती. तर त्यांच्या समोर जमीनीवर संघाचा एक कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदी भारतीय बैठकीत बसलेले दिसत आहेत. हा फोटो सांगतो की भारतीय लोकशाहीत एक सामान्य कार्यकर्ता आपल्या कर्म, संघटन आणि जनतेच्या विश्वासाने देशाच्या सर्वाच्च नेते पदी कसा पोहचू शकतो.
व्हायरल होणाऱ्या या फोटोतील मोहोल खूपच साधारण आहे. मोठा मंडप, हजारो कार्यकर्ते, आणि समोरच्या रांगेत ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या ठीकसमोर बसलेले तरुण कार्यकर्ते बसलेले दिसत आहेत. त्यांची ओळख नंतर भारतीय राजकारणात सर्वात प्रभावशाली चेहऱ्यात झाली आहे. हाच तो क्षण आहे. जी सच्च्या लोकशाहीची निशाणी म्हणून सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.
बिहार विधानसभेत NDA ला 243 पैकी 202 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला 89,जेडीयूला 85,एलजेपी ( आर ) ला 19,आणि आरएलएमला 4 जागा मिळाल्या आहेत.राजकीय विश्लेषकांच्या मते या विजयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा साल 1995 चा फोटो व्हायरल होत आहे.
भारतीय लोकशाहीची विशेषत: एक साधारण कार्यकर्ता ते शीर्ष नेतृत्वापर्यंतचा प्रवास दाखवणारे चित्र
राजकारणातील साधे आणि जमीनीशी जुळलेले व्यक्तीमत्व
ज्येष्ठ नेत्यांच्या समोर जमीनीवर बसण्याचा विनम्र दृश्य
1995 ची स्थिती आणि आजची राजकीय स्थितीतील फरक दाखवणारे दृश्य
बिहार येथील अलिकडील विजयानंतर मोदी यांच्या प्राथमिक भूमिकेचा संदर्भ
1995 चा तो क्षण – का बनला या फोटोच्या स्मृतीचे सर्वात मोठे कारण
त्याकाळात गुजरात येथे राजकारणात संघटनेची भूमिका सर्वात मोठी होती.
येथे पहा पोस्ट –
हा फोटो भारतीय राजकारणातील त्या बदलालाही दर्शवत आहे. ज्याला संघटना आधारित राजकारण म्हटले जाते. जेथे एक साधा कार्यकर्ता देखील कठोर परिश्रम आणि जनतेच्या विश्वासावर देशातील सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो.त्यामुळे जेव्हा एनडीएने बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवले तर तेव्हा सोशल मीडियावर “लोकशाही प्रवासाचे प्रेरणादायी उदाहरण” असे म्हणत हा फोटो मोदींचे चाहते शेअर करत आहेत.