भारत चंद्रावर केव्हा मानव पाठविणार ? ISRO ने दिली गगनयानबद्दलची माहीती

चंद्रयान-3 च्या यशानंतर भारत चंद्रावर मानव पाठविण्याची तयारी करीत आहे. या योजनेचा भाग म्हणून आधी चार टेस्ट फ्लाईट अंतराळात पाठविण्यात येणार आहेत.

भारत चंद्रावर केव्हा मानव पाठविणार ? ISRO ने दिली गगनयानबद्दलची माहीती
Gaganyaan
Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 15, 2023 | 3:39 PM

बंगळुरु | 15 ऑक्टोबर 2023 : भारताचे चंद्रयान-3 मोहिम प्रचंड यशस्वी झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) आपली पहिली गगयान मोहीमेची पहिली टेस्ट फ्लाईट येत्या 21 ऑक्टोबर रोजी अंतराळात पाठविणार आहे. याबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी स्वत: या मोहिमेची माहीती दिली आहे. रामेश्वरममध्ये एका कार्यक्रमात सोमनाथ यांनी सांगितले की 21 ऑक्टोबरला पहिली टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाईट ( TV-D1 ) नंतर D2,D3, आणि D4 ची योजना आहे. म्हणजे सुरुवातीला चार टेस्ट फ्लाईट पाठविण्यात येणार आहेत.

चंद्रयान-3 च्या यशानंतर भारत चंद्रावर मानव पाठविण्याची तयारी करीत आहे. या योजनेचा भाग म्हणून आधी चार टेस्ट फ्लाईट अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. भारताचे राकेश शर्मा हे रशियाच्या यानातून अंतराळात गेलेले भारतीय होते. आता आधी अंतराळात मानव पाठविण्याची तयारी केली जात आहे. टेस्ट फ्लाईटमध्ये क्रु मॉड्युलला आउटर स्पेसमध्ये लॉंच करणे, पृथ्वीवर परत आणणे आणि बंगालच्या खाडीत टचडाऊन करुन पुन्हा कॅप्सुल रिकव्हर करण्यात येणार आहे. क्रु मॉड्युल गगनयान मिशन दरम्यान अंतराळवीरांना आऊटर स्पेसमध्ये घेऊन जाणार आहे.

पुढच्या वर्षी अनमॅन्ड आणि मॅन्ड मिशनची योजना

गगनयान मोहिमेत इस्रो पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला गगनयान मोहिमेची पहिली अनमॅन्ड मोहीम राबविणार आहे. अनमॅन्ड मिशनला यश आल्यास नंतर मानव अंतराळात पाठविण्यात येणार आहे. इस्रोने गगनयान मोहिमेच्या ड्रॅग पॅराशूटची यशस्वी चाचणी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान चंदीगड येथे केली होती. हे पॅराशूट अंतराळवीरांना सेफ लॅंडींग करण्यास मदत करणार आहे. ते क्रु मॉडेलचा वेग कमी करेल आणि स्थिर करेल. त्यामुळे अंतराळवीरांच्या लॅंडींग स्थिती टेस्टींग दरम्यान केली जाईल.

3 अंतराळवीर 400 किमीवर जातील, 3 दिवसानंतर परत येतील

गगनयान या तीन दिवसांच्या मोहिमेसाठी तीन सदस्यांचे दल 400 किमी पृथ्वीच्या कक्षेत नेले जातील. त्यानंतर क्रु मॉड्युलला सुरक्षित समुद्रात लँड करण्यात येतील. जर भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा चौथा देश ठरेल.
12 एप्रिल 1961 सोव्हीएत रशियाचे युरी गागारिन 108 मिनिट अंतराळात राहणार पहिले नागरिक ठरले होते. तर भारताचे राकेश शर्मा हे 3 एप्रिल 1984 रोजी रशियाच्या सोयुज टी-11 या यानाने अंतराळात गेले होते. 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. एकूण 12 जणांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे.