GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?

भारताला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाले. मात्र, याच काळात आशिया आणि जगातील अन्य देशांनी देखील नवीन सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राष्ट्राला उद्देश्यून केलेल्या भाषणात भारतासोबत स्वतंत्र झालेल्या देशांचा उल्लेख केला आहे. भारत मागे राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पाहूयात कोणते देश पुढे गेले आहेत.

GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?
india
| Updated on: Apr 18, 2026 | 11:43 PM

१८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देश्यून भाषण केले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना भारतासोबत स्वतंत्र झालेल्या देशांची प्रगती झाली, परंतू भारत मागे राहिला असे सांगितले. चला तर पाहूयात भारतासोबत कोणते देश स्वतंत्र झाले आणि सध्या ते भारताच्या तुलनेत कुठे उभे आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतर १९४० च्या दशकात वसाहतवाद समाप्त होऊन अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ वाजता ब्रिटीश शासनाकडून स्वंतत्र झाला. मात्र याच काळात आशिया आणि जगातील अनेक देशांचीही नवीन सुरुवात झाली. मात्र, एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालेले हे देश प्रगतीच्या विविध टप्प्यात आहेत.

पाकिस्तान (१९४७ ) –

भारतासोबत फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ मध्ये पाकिस्तान तयार झाला. पाकिस्तानमध्ये नेहमीच राजकीय अस्थिरता असल्याने अनेकदा सैन्याने सत्ता हातात घेतली. जागतिक बँक आणि IMF च्या अहवालानुसार पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई, कर्ज आणि परकीय चलन संकटाने पाकिस्तान त्रस्त आहे. भारताची आणि पाकिस्तानची तुलना केली तर भारताची स्थिती चांगली आहे.

श्रीलंका (१९४८ ) –

श्रीलंकेला (तत्कालीन सिलोन) ४ फेब्रुवारी १९४८ मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले. येथे अनेक वर्षे स्थिर अर्थव्यवस्था होती. परंतू २०२२ मध्ये श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परकीय चलन समाप्त होणे, कर्ज बाजारीपणा अशी स्थिती झाली. मात्र, आता IMF च्या मदतीने आता हळूहळू श्रीलंकेची गाडी रुळावर येत आहे. जुलै २०२२ मध्ये श्रीलंकेत उठाव होऊन जनतेसमोर सत्तेला नमावे लागले.

म्यानमार (१९४८) –

मान्यमारला ( आधीचा ब्रह्मदेश ) ४ जानेवारी १९४८ ला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले. येथे काही वर्षे लोकशाही होती. परंतू १९६२ पासून लष्कराचा प्रभाव वाढत गेला. २०२१ मध्ये सैन्याने पुन्हा सत्तापालट कला. त्यानंतर देशात राजकीय अस्थिरता आणि हिंसा जारी आहे. येथे स्थिती अजूनही अस्थिर असल्याचे संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे.

इंडोनेशिया (१९४५/१९४९) –

इंडोनेशियाने १९४५ मध्ये स्वातंत्र्याची घोषणा केली. मात्र नेदरलँडने त्यांना १९४९ मध्ये अधिकृतपणे मान्यता दिली. आज इंडोनेशिया दक्षिण-पूर्व आशियात सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि हा देश G20 चा सदस्य आहे. जागतिक बँकेनुसार इंडोनेशिया एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था असून सतत विकास होत आहे.

व्हिएतनाम (१९४५) –

फ्रान्स पासून स्वंतत्र झाल्याची घोषणा व्हिएतनामने १९४५ मध्ये केली. मात्र, फ्रान्स आणि अमेरिकेशी प्रदीर्घ युद्धानंतर १९७५ मध्ये देश संघटीत झाला. आज व्हिएतनाम वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आणि जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे.जागतिक बँक आणि IMF ने या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ स्थिर म्हटली आहे. मात्र, व्हिएतनाम भारतापेक्षा खूप मागे आहे.

चीन (१९४९  – सत्ताबदल) –

चीन हा भारतासारखा वसाहतवादापासून स्वतंत्र झाला नाही. १ ऑक्टोबर १९४९ मध्ये झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर Mao Zedong यांनी पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केली. आज चीन जागतिक बँकेनुसार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि जागतिक मॅन्युफॅक्चरिंगची हब आहे. मात्र, चीनमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. चीन आणि भारताची लोकसंख्या जवळपास सारखी आहे. मात्र, चीन विकसित देशांच्या यादीत आहे.

Follow Us