AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपा, काँग्रेसचा प्रवक्ता व्हायचंय? सामान्य कार्यकर्तादेखील… वाचा काय करावं लागतं? शिक्षणाची अट काय?

Political Party Spokesperson : काँग्रेस, भाजप, शिवसेना किंवा इतर मोठ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते अनेक मुद्द्यांवर पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडताना दिसतात. आज आपण प्रवक्ता बनण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते जाणून घेऊयात.

भाजपा, काँग्रेसचा प्रवक्ता व्हायचंय? सामान्य कार्यकर्तादेखील... वाचा काय करावं लागतं? शिक्षणाची अट काय?
_How to become political spokespersonImage Credit source: Google
| Updated on: Jun 06, 2026 | 5:48 PM
Share

भारतीय राजकारणात राजकीय पक्षांचे प्रवक्ते आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. टीव्ही डिबेट्स, पत्रकार परिषद आणि मीडिया ब्रीफिंगमध्ये प्रवक्ते आपापल्या पक्षाचे चेहरे बनलेले आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना किंवा इतर मोठ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते अनेक मुद्द्यांवर पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडताना दिसतात. त्यामुळे अनेक तरुणांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता होण्यासाठी कोणती पदवी किंवा पात्रता आवश्यक असते? आज आपण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महत्त्वाची बाब म्हणजे भारतात कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता होण्यासाठी संविधान, निवडणूक आयोग किंवा कोणत्याही सरकारी संस्थेकडून विशिष्ट शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली नाही. याचाच अर्थ प्रवक्ता होण्यासाठी कोणती खास पदवी असणे बंधनकारक नाही. मात्र, काही विषयांतील शिक्षण आणि अनुभव या भूमिकेसाठी निश्चितच उपयुक्त ठरतात.

कोणती पदवी फायदेशीर?

एखाद्या पक्षाचा प्रवक्ता बनण्यासाठी मास कम्युनिकेशन, राज्यशास्त्र, पीआर, कायदा, पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. या विषयांच्या शिक्षणामुळे राजकीय व्यवस्था, मीडिया व्यवस्थापन, जनसंपर्क आणि धोरणात्मक मुद्द्यांची चांगली समज विकसित होते, जी प्रवक्त्याची भूमिका पार पाडताना उपयोगी पडते.

या कौशल्यांचीही गरज

राजकीय पक्षाचा प्रवक्ता बनण्यासाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसते. या पदावर यशस्वी होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या कौशल्यांचीही आवश्यकता असते. प्रवक्त्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्याची बोलण्याची क्षमता. प्रवक्त्यांना टीव्ही चॅनेल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पत्रकार परिषदांमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने मांडता आली पाहिजे. अशा उमेदवारांना प्राधान्य मिळू शकते. तसेच देश-विदेशातील घडामोडी, सरकारी धोरणे, विरोधकांचे आरोप आणि स्वतःच्या पक्षाची विचारधारा यांची सखोल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

वादविवाद कौश्यल्य हवे

टीव्ही डिबेटमध्ये अनेकदा कठोर प्रश्न आणि तीव्र वादविवादाचे वातावरण असते. अशा परिस्थितीत प्रवक्त्याकडे मजबूत तर्कशक्ती, संयम आणि तात्काळ उत्तर देण्याची क्षमता असणे आवश्यक असते. माध्यमांचे कामकाज आणि बातम्यांचे स्वरूप समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच अनेक पत्रकार, वकील आणि राजकीय विश्लेषक पुढे जाऊन राजकीय पक्षांचे प्रवक्ते बनतात.

राजकीय प्रवक्ता कसे बनता येते?

आपल्या देशातील राजकीय पक्ष आपल्या सक्रिय आणि विश्वासू कार्यकर्त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देतात. त्यासाठी पक्षात दीर्घकाळ काम करणे, संघटनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. एकंदरीत एखाद्याला प्रवक्ता बनायचे असेल तर त्याला राजकीय ज्ञान, पक्षाची ध्येय-धोरणे, बोलण्याची कला, सहनशक्ती आणि राजकीय अनुभव असणे गरजेचे आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?