ब्लॅक कॅट कमांडो कोण बनतं? 14 महिन्यांचं कठोर प्रशिक्षण, पगार किती मिळतो? जाणून घ्या खास गोष्टी

NSG Commando : इंडियन आर्मीचे NSG कमांडो हे देशातील अत्यंत प्रशिक्षित कमांडो दलांपैकी एक मानले जातात. त्यांचे मुख्य काम दहशतवादविरोधी कारवायांसाठी तत्पर राहण्याचं आहे.

ब्लॅक कॅट कमांडो कोण बनतं? 14 महिन्यांचं कठोर प्रशिक्षण, पगार किती मिळतो? जाणून घ्या खास गोष्टी
NSG Commando
Image Credit source: social media
| Updated on: Oct 04, 2026 | 4:49 PM

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक अर्थात NSG कमांडो हे देशातील सर्वात प्रशिक्षित कमांडो दलांपैकी एक मानले जाते. काळा गणवेश आणि हेल्मेटमुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट कमांडो’ म्हणून ओळखले जाते. दहशतवादविरोधी कारवाया, ओलिसांची सुटका आणि विशेष मोहिमांसाठी त्यांना तयार केले जाते. आता NSG कमांडोंना व्हीआयपी सुरक्षा कर्तव्यातून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे दिली गेली आहे. त्यामुळे NSG कमांडो पुन्हा प्रामुख्याने दहशतवादविरोधी कारवायांवर लक्ष केंद्रित करतील. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये (२४ ते २८ सप्टेंबर) अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेची व्यवस्थाही याच NSG कमांडोंकडे सोपवण्यात आली होती. पण हे ब्लॅक कॅट कमांडो कोण बनतात आणि त्यांना किती पगार मिळतो? याबद्दल जाणून घेऊयात.

NSG कमांडो कोण बनू शकतो?

दरम्यान, NSG मध्ये थेट सामान्य उमेदवारांची भरती होत नाही. भारतीय सशस्त्र दल तसेच आर्मी, CRPF, BSF आणि ITBP सारख्या दलांमधील निवडक जवानांची NSG साठी निवड केली जाते. निवड झाल्यानंतर त्यांना कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्यांना सामोरे जावे लागते.

Loading...

१४ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण

निवड झालेल्या जवानांना सुमारे १४ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. अत्याधुनिक शस्त्रांचा वापर, बंदूक हाताळणे, स्फोटकांचे ज्ञान, दहशतवादविरोधी कारवाई आणि ओलिसांची सुटका याचे प्रशिक्षण दिले जाते. शारीरिक क्षमतेसोबत मानसिक ताकदीवरही भर दिला जातो.

ब्लॅक कॅट का म्हणतात?

NSG कमांडो काळा गणवेश आणि हेल्मेट वापरतात. त्यांच्या चिन्हावरही काळ्या मांजरीचे प्रतीक आहे. वेग, चपळता आणि गुप्त कारवाईशी जोडल्या जाणाऱ्या या प्रतिमेमुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट कमांडो’ म्हटले जाते.

NSG कमांडोंचा पगार किती?

उपलब्ध अहवालांनुसार, प्रशिक्षणादरम्यान सुमारे 18,000 रुपये मासिक स्टायपेंड मिळतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पगार सुमारे 40,000 ते 85,000 रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय प्रवास भत्ता, महागाई भत्ता, रेशन, सरकारी निवास, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळतात.

(महत्त्वाचे :  पगारांच्या संबंधीची आकडेवारी ही अधिकृत आकडेवारी नाही. केवळ उपलब्ध अहवालांवरून घेण्यात आलेली आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us