
चंदीगड: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरील सस्पेन्स अखेर उठला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीतसिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. चन्नी हे दलित समाजातील नेते आहेत. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पक्ष मजबूत आणि प्रबळ स्पर्धक आहे. त्यामुळे आपला रोखण्यासाठी काँग्रेसने राज्यात फेरबदल केल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय राज्यात बसपा आणि अकाली दलाची युती झाली आहे. त्यामुळे दलित व्होट आपल्याकडे खेचण्यासाठीच काँग्रेसने राज्याचं नेतृत्व दलित नेत्याच्या हाती देऊन मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे. (Who is Charanjit Singh Channi, the new Punjab chief minister)
चरणजीतसिंग चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते अमरिंदर सिंग सरकारमध्ये शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री होते. त्यापूर्वी ते 2015 ते 2016पर्यंत पंजाबमध्ये विरोधी पक्षनेते होते. चरणजीतसिंग चेन्नी हे रामदासिया शीख समुदायातील आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये ते 16 मार्च 2017मध्ये वयाच्या 47व्या वर्षी कॅबिनेट मंत्री झाले होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा आमदार झाले होते. चरणजितसिंह चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात.
चरणजितसिंह हे 48 वर्षांचे आहेत. पंजाबमध्ये दलितांची टक्केवारी ही 30 टक्क्यांच्या आसपास आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही सर्व मतं निर्णायकी ठरतील असा अंदाज बांधून चन्नींना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचं जाणकार सांगतायत.
चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील दलित चेहरा आहे. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते. नंतर ते कॅप्टन यांच्या विरोधात गेले. 2017मध्ये चन्नी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री बनले होते. ते स्वत: 12 वी पास आहेत. त्यामुळे वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी 2017मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली होती. अत्यंत साधा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दलित चेहरा आणि शीख चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चन्नी यांचा काँग्रेसला किती फायदा होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीही स्ट्राँग आहे. एबीपीने नुकत्याच केलेल्या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये आपने 35.1 टक्के व्होट मिळू शकतात. म्हणजे पंजाबमध्ये आप 51 ते 57 जागांवर निवडून येऊ शकते. तर काँग्रेसला 28.8 टक्के मते मिळ शकतात. म्हणजे काँग्रेसच्या वाट्याला 38 ते 46 जागा येऊ शकतात. तर शिरोमणी अकाली दलाला 21.8 टक्के मते मिळू शकतात. अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळू शकतात. राज्यातील जनता काँग्रेसवर नाराज असल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. काँग्रेसला केवळ 46 तर आपला 56 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपलाही रोखण्यासाठी आणि दलित व्होट आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने दलित चेहरा देऊन मोठा गेम केल्याचं सांगितलं जात आहे.
पंजाबमध्ये आपचे 20 आमदार आहेत. त्यापैकी आता आपकडे 16 आमदार राहिले आहेत. त्यापैकी दोन आमदार आता आपसोबत नाहीत. तीन आमदारांनी आपचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आमदारांची होत असलेल्या गळतीमुळे आपची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, असं असलं तरी आपची ताकद काही घटलेली नाही. त्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे. त्यामुळेच काँग्रेसने पक्षांतर्गत वादाचा फायदा घेऊन राज्यात भाकरी फिरवल्याचं सांगितलं जात आहे.
बहुजन समाज पार्टी आणि अकाली दलाची पंजाबमध्ये तब्बल 25 वर्षानंतर युती झाली आहे. ही युती आगामी विधानसभा एकत्र लढणार आहे. यावेळी अकाली दल विधानसभेच्या 20 जागा लढवणार आहे. तर बाकी जागांवर बसपा डाव टाकणार आहे. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या 33 टक्के दलित आहेत. त्यामुळे या युतीला रोखणं कठिण जाऊ शकतं. म्हणूनच काँग्रेसने राज्यात दलित नेतृत्व दिल्याचं सांगितलं जात आहे.
2011 च्या जनगणनेनुसार देशातील कोणत्याही राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 88.60 लाख आहे. यातील अर्ध्याहून अधिक लोक ग्रामीण भागात राहणारे आहेत. 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जातीतील 73.33 टक्के लोक ग्रामीण भागात तर 26.67 टक्के लोक शहरी भागात राहतात. राज्यातील एकूण 23 जागांवर अनुसूचित जातीतील मते निर्णायक असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे बसपा यापैकी 18 जागांवर लढण्याची शक्यता आहे. पंजाब निवडणुकीत स्वत: मायावती आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये एकूण 117 विधानसभेच्या जागा आहेत. याआधी भाजपशी युती करून अकाली दलाने 23 जागांवर निवडणूक लढवली होती.
यापूर्वी 1996मध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी अकाली दल आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने 13 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. यात बसपाला तीन तर अकाली दलाला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळाला होता. आता 25 वर्षानंतर या दोन्ही पक्षांचा राज्यातील जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष काँग्रेसला धक्का देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच चन्नी यांच्याकडे काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिल्याचं सांगितलं जात आहे. (Who is Charanjit Singh Channi, the new Punjab chief minister)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 Super Fast News | 19 September 2021 https://t.co/BdRdiXtpTa #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
संबंधित बातम्या:
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून दलित नेत्याला संधी, चरणजितसिंह चन्नींच्या नावाची घोषणा
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?
(Who is Charanjit Singh Channi, the new Punjab chief minister)