तुमचं तर ISIच्या महिला एजंटसोबत कनेक्शन, माझ्याकडे पुरावे, तोंड उघडायला लावू नका; सिद्धूंच्या सल्लागाराचा पलटवार

नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्कर प्रमुख बाजवा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला होता. सिंग यांच्या आरोपावर सिद्धू यांच्या सल्लागाराने पलटवार केला आहे. (Punjab ex DGP takes on Amarinder Singh for calling Sidhu anti national says captain sir don't open my mouth)

तुमचं तर ISIच्या महिला एजंटसोबत कनेक्शन, माझ्याकडे पुरावे, तोंड उघडायला लावू नका; सिद्धूंच्या सल्लागाराचा पलटवार
Amarinder Singh
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 4:00 PM

चंदीगड: नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्कर प्रमुख बाजवा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला होता. सिंग यांच्या आरोपावर सिद्धू यांच्या सल्लागाराने पलटवार केला आहे. तुमचे तर आयएसआयच्या महिला एजंटसोबत कनेक्शन आहेत. माझ्याकडे त्याबाबतचे पुरावे आहेत. उगाच तोंड उघडायला लावू नका, असा पलटवारच सिद्धू यांच्या सल्लागाराने केला आहे. (Punjab ex DGP takes on Amarinder Singh for calling Sidhu anti national says captain sir don’t open my mouth)

नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार आणि पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी हा दावा केला आहे. मोहम्मद मुस्तफा यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे पुराव्याचा ढिग पडलाय, असा इशारा मुस्तफा यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी एका गाण्याचा व्हिडीओही शेअर केला आहेत. ‘राज को राज रहने दो…’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्याच्या माध्यमातून मुस्तफा यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सूचक इशारा दिला आहे.

सिद्धूच्या देशभक्तीवर शंका नको

कॅप्टन सर, आपण अनेक वर्षापासून कौटुंबीक मित्रं आहोत. मला तोंड उघडायला मजबूर करू नका. तोंडावरच खोटं बोलण्याची तुमच्याकडे कला आहे, हे मला माहीत आहे. नवज्योतसिंग सिद्धूंवर राजकीय टीका वगैरे ठिक आहे. मात्र, त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणं गैर आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अकाऊंटवर जगभरातील पैसा

14 वर्ष तुम्ही एका महिला आयएसआय एजंट सोबत होता. मात्र, तुम्ही सरकारमधील तिच्या हस्तक्षेपावर एका शब्दानेही प्रतिक्रिया दिली नाही. तुम्ही तुमच्या विदेशातील अकाऊंटवर जगभरातील पैसा पाठवला. अशावेळी तुम्हाला राष्ट्रवादावर भाषण देणं शोभत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

तुमच्या पापाचे पुरावे माझ्याकडे

मुस्तफा यांनी पुन्हा दुसरं ट्विट केलं. त्यातही त्यांनी बरीच माहिती दिली. माझ्याकडे तुमच्या पापांचे पुरावे आहेत. तुम्हाल जे माहीत आहे, ते मलाही माहीत आहे. तुमचा सन्मान करतो म्हणून मी काहीच माहिती सार्वजनिक केली नाही, हे तुम्हाला माहीत नसेल. तुम्ही चुकीच्या पद्धतीने यूपीएससीच्या माध्यमातून आरोडा सोबत माझे संबंध जोडले. तेव्हाही मी राहुल गांधी यांना काहीच सांगितलं नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

रंधावा रेसमध्ये

पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटताना दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे याबाबत बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याकडे हा प्रश्न गेला आहे. सोनिया गांधी आणि अंबिका सोनी यांची गेल्या पाऊण तासापासून मिटिंग सुरू असून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, पंजाब काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव सोनिया गांधींकडे पाठवल्याचं सांगितलं जातं. (Punjab ex DGP takes on Amarinder Singh for calling Sidhu anti national says captain sir don’t open my mouth)

संबंधित बातम्या:

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा; सोनिया गांधींकडे खलबतं सुरू

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा; अमरिंदर सिंग यांनी थेट हायकमांडला ललकारले

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबिका सोनीच!, सोनिया गांधींचं शिक्कामोर्तब; पण सोनी यांचा नकार

(Punjab ex DGP takes on Amarinder Singh for calling Sidhu anti national says captain sir don’t open my mouth)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.