चिथावणीखोर भाषणांनी चर्चेत आलेली काजल हिंदुस्तानी कोण?, दोन गटात राडा घडवल्याचा आरोप?; का होतेय ट्रेंडिंग?

ऊनामध्ये दोन समुदायात तणाव निर्माण झाल्यानंतर काजल हिंदुस्तानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्यावर प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे.

चिथावणीखोर भाषणांनी चर्चेत आलेली काजल हिंदुस्तानी कोण?, दोन गटात राडा घडवल्याचा आरोप?; का होतेय ट्रेंडिंग?
Kajal Hindustani
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2023 | 1:14 PM

अहमदाबाद : गुजरातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या काजल हिंदुस्तानी चर्चेत आहे. तिच्या चिथावणीखोर भाषणांमुळे ती अधिक चर्चेत आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये रामनवमीनंतर तणाव झाला. त्यानंतर ऊनामध्येही तणाव निर्माण झाला आहे. त्यामागेही रामनवमीच्यावेळी झालेलं चिथावणीखोर भाषण असल्याचं सांगितलं जात आहे. आणि हे चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप काजल हिंदुस्तानीवर आहे. अचानक चर्चेत आलेल्या काजल हिंदुस्तानीने ऊना येथे विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात भाग घेतला होता. तिथे तिने वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषण केलं. त्यामुळे तणाव वाढल्याचं सांगितलं जात आहे.

एका ठरावीक समुदायाच्या विरोधात काजलने प्रक्षोभक भाषण केल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या भाषणानंतरच धार्मिक तणाव निर्माण झाला. या तणावानंतर काजल हिंदुस्तानी चर्चेत आलीय. काजलचं खरं नाव काजल सिंगला आहे. ती विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात सामील झाली होती. त्यानंतर ती चर्चेत आली. तिच्या या वादग्रस्त विधानामुळे तिला अटक करण्याची मागणी केली जात आहे. तिच्या विरोधात भादंवि कलम 295 (अ) अनन्यवे गुहा दाखल केला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

ऊना येथे 30 मार्च रोजी रामनवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषदेने हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. त्या संमेलनात काजलने भाग घेतला होता. यावेळी तिने मुस्लिम समुदायाच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केलं. तसेच मुस्लिम महिलांच्या बाबतही तिने वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे ऊनामध्ये तणाव निर्माण झाला होता. या भाषणानंतर दोन्ही समुदायांनी एकमेकांच्या विरोधात दगडफेक केली होती.

कोण आहे काजल हिंदुस्तानी?

काजल हिंदुस्तानीच्या ट्विटरवरील बायोडाटानुसार ती व्यावसायिका, सामाजिक कार्यकर्ती आणि संशोधक आहे.

काजल हिंदुस्तानीचं खरं नाव काजल सिंगला आहे. ती राजस्थानच्या सिरोही येथील रहिवाशी आहे

सध्या काजल ही गुजरातच्या जामनगर आणि अहमदाबादमध्ये रादते

भारताला हिंदुराष्ट्र करण्याची भाषा ती उघडपणे करत असते. स्वत:ला ती प्रखर राष्ट्रवादी समजते

ट्विटरवर तिचे 86.8 हजार फॉलोअर्स आहेत.

2019च्या लोकसभा निवडणुकीत तिने भाजपसाठी प्रचार केला होता. देशातील अनेक राज्यात जाऊन तिने भाजपचा प्रचार केला होता.

2019च्या लोकसभा निवडणुकीत तिने भाजप नेते ओम बिर्ला यांचा राजस्थानमध्ये प्रचार केला होता.

तिने टीव्हीवरील अनेक वाद आणि चर्चांमध्ये भाग घेतला आहे.

पाकिस्तानातील सर्व हिंदुंना भारतात आणावं असं तिचं म्हणणं आहे.

ती गुजरातमधील विद्यापीठ आणि शाळांमध्ये नियमितपणे भाषणे देत असते. तसेच येथील सांस्कृतिक कार्यक्रमातही ती भाग घेत असते.